ठाण्यात वृक्षांना राखी बांधून शिवशांती प्रतिष्ठानचे अनोखे रक्षाबंधन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2021 05:23 PM2021-08-22T17:23:24+5:302021-08-22T17:28:53+5:30

वृक्षांना राखी बांधून तसेच वृक्षारोपण करुन ठाण्यातील शिवशांती प्रतिष्ठान आणि रुद्र प्रतिष्ठानने रविवारी अनोखे रक्षाबंधन साजरे केले. नागरिकांनीही मोठया संख्येने एकत्र येऊन वृक्षारोपण करुन पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार घेण्याचे आवाहनही विनय सिंग यांनी यावेळी केले.

Unique Rakshabandhan of Shivshanti Pratishthan by tying rakhi to trees in Thane | ठाण्यात वृक्षांना राखी बांधून शिवशांती प्रतिष्ठानचे अनोखे रक्षाबंधन

१६६ वी वृक्षारोपण मोहीम पूर्ण

Next
ठळक मुद्दे १६६ वी वृक्षारोपण मोहीम पूर्ण१६०० रोपांची लागवड

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: वृक्षांना राखी बांधून तसेच वृक्षारोपण करुन ठाण्यातील शिवशांती प्रतिष्ठान आणि रुद्र प्रतिष्ठानने रविवारी अनोखे रक्षाबंधन साजरे केले. आतापर्यंत एक हजार ६०० वृक्षांचे रोपण झाले असून रविवारी १६६ वी वृक्षारोपण मोहीम यशस्वी केल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनय सिंग यांनी दिली.
रविवारी रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर वागळे इस्टेट परिसरातील सावरकरनगर येथील झाडांना राखी बांधून रुद्र प्रतिष्ठानच्या वतीने वृक्ष लागवड मोहीम पूर्ण करण्यात आली. गेल्या अनेक वर्षांपासून पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी विनयकुमार सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली दर आठवडयाला वृक्ष लागवडीचा उपक्रम निरंतर आयोजित केला जात आहे. रविवारी या संस्थेने वृक्षारोपणाची ही १६६ वी मोहीम पूर्ण केली असून आतापर्यंत एक हजार ६०० रोपांची लागवड केली. मोठी झाडे किंवा अगदी लहान वनस्पती ही मानवी जीवनाचे रक्षक आहेत. बहिणी ज्याप्रमाणे स्वत:च्या संरक्षणासाठी आपल्या भावांना औक्षण करुन राखी बांधतात. त्याचप्रमाणे मानव जातीच्या रक्षणासाठी सर्वप्रथम झाडावेलींचे आभार मानून पर्यावरणाला राखी बांधली पाहिजे. नागरिकांनीही मोठया संख्येने एकत्र येऊन वृक्षारोपण करुन पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार घेण्याचे आवाहनही विनय सिंग यांनी यावेळी केले. यावेळी रंजीत सिंह, गोपाल ठाकूर आणि शिवशांती कुटूंबातील इतर सदस्यांनीही श्रमदान करुन वृक्षारोपण केले.

Web Title: Unique Rakshabandhan of Shivshanti Pratishthan by tying rakhi to trees in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.