उल्हासनगरमध्ये युतीला पर्याय नाही
By admin | Published: February 24, 2017 05:04 AM2017-02-24T05:04:38+5:302017-02-24T05:04:38+5:30
उल्हासनगरमध्ये कोणत्याही परिस्थितीत स्वबळावर सत्ता स्थापन
उल्हासनगर : उल्हासनगरमध्ये कोणत्याही परिस्थितीत स्वबळावर सत्ता स्थापन करायची, या ईर्षेपोटी राष्ट्रवादी काँग्रेस फोडणाऱ्या भाजपाला या ‘परकीय’ शक्तीचा फायदा झाला, पण स्वबळावर सत्तेचे स्वप्न भंगले.
ज्या पप्पू कलानी यांच्याशी संबंधावरून राजकारणाचे गुन्हेगारीकरण हा शब्द भाजपाने एकेकाळी राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आणला, त्याच कलानी यांच्या मुलाला पक्षात प्रवेश दिल्याने भाजपाच्या नेत्यांची इतकी कोंडी झाली, की स्वबळाच्या सत्तेसाठी केल्या जाणाऱ्या प्रचाराला पक्षाचा एकही नेता फिरकला नाही.
शिवसेनेने भाजपाच्या राजकारणाला तोडीस तोड उत्तर देत केलेला प्रचार हे या वेळच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य ठरले.
भाजपा आणि ओमी टीमचे ३३ तर शिवसेनेचे २५ नगरसेवक निवडून आले. साई पक्षाने सिंधी परिसरात भाजपाला टक्कर देत ११ जागी विजय मिळविला. बहुतांश नगरसेवक मागल्या दाराने भाजपामध्ये गेल्याच्या धक्क्यातून राष्ट्र्वादी सावरू शकली नाही. तो पक्ष ४ जागांवर स्थिरावला. मनसे या शहरात एकही जागा मिळवू शकली नाही.
उल्हासनगर
पक्षजागा
भाजपा३३
शिवसेना२५
काँग्रेस०१
राष्ट्रवादी०४
इतर१५