चेन स्रॅचिंंग, घरफोड्या यांची वसईत उकल

By Admin | Published: December 25, 2015 02:03 AM2015-12-25T02:03:46+5:302015-12-25T02:03:46+5:30

या तालुक्यात घरफोड्या आणि चैन स्रॅचिंंग करुन उच्छाद मांडणाऱ्या पाच गुन्हेगारांना अटक केली आहे. २५ गुन्ह्यांची उकल करून पोलिसांनी त्यांच्यांकडून १५ लाखांहून

Unmask the height of the chain ceiling, burglar | चेन स्रॅचिंंग, घरफोड्या यांची वसईत उकल

चेन स्रॅचिंंग, घरफोड्या यांची वसईत उकल

googlenewsNext

वसई : या तालुक्यात घरफोड्या आणि चैन स्रॅचिंंग करुन उच्छाद मांडणाऱ्या पाच गुन्हेगारांना अटक केली आहे. २५ गुन्ह्यांची उकल करून पोलिसांनी त्यांच्यांकडून १५ लाखांहून अधिकचा मुद्देमालही हस्तगत केला आहे.
घरफोडीच्या गुन्ह्यात दोन आणि चेन स्रॅचिंगच्या गुन्ह्यात तीन अशा पाच सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. २२ घरफोडी गुन्ह्यांची उकल केली असून तब्बल १२ लाख ३५ हजार ४४५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तर चेन स्रॅचिंंगचे ३ गुन्हे उघडकीस आणून ३ लाख १ हजार ३०० रुपयांचा माल जप्त केला आहे. घरफोडी प्रकरणात मोहम्मद रहिमुल इब्राहिम अन्सारी (२४) व मोहम्मद परवेझ मोहम्मद जाहिद शेख (२५) यांना अटक करण्यात आली आहे. या आरोपींनी अर्नाळा ४, नालासोपारा ३, तुळींज ८, विरार ५ मिळून २२ घरफोड्या केल्या होत्या.
दिपक सुरेश शिकरे (२१), प्रणव किशोर अंबावकर (२३) व राहुल विष्णू खोपकर (१८) अशी चेन स्रॅचिंगच्या गुन्ह्यात जेरबंद केलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींंनी तुळींज व माणिकपूर ठाण्याच्या हद्दीत केलेले सहा गुन्हे उघडकीस आणून ३ लाख १ हजार ३०० रु. ची मंगळसूत्रे, चेन व ६ दुचाकी जप्त केल्या आहेत.
(प्रतिनिधी)

Web Title: Unmask the height of the chain ceiling, burglar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.