चॉकलेटचे अमिष दाखवून दुकानात अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2020 08:33 PM2020-09-29T20:33:49+5:302020-09-29T20:37:42+5:30
चॉकलेटचे अमिष दाखवून एका दहा वर्षीय मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करणाऱ्या अँथोनी अपात्रे नाडार (५६) याला श्रीनगर पोलिसांनी रविवारी अटक केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: चॉकलेटचे अमिष दाखवून एका दहा वर्षीय मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करणाºया अँथोनी अपात्रे नाडार (५६, रा. वारलीपाडा, श्रीनगर, इाणे) याला श्रीनगर पोलिसांनी रविवारी अटक केली आहे. त्याला एक दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
वारलीपाडा भागात राहणाºया या अल्पवयीन मुलाला चॉकलेटच्या अमिषाने किराणा दुकानाचा मालक नाडार घरी बोलवित असे. त्याने २५ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास त्याला नेहमीप्रमाणे दुकानात बोलवून त्याच्याशी अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केला. या प्रकाराने भेदरल्याने तसेच या दुकान मालकाने धमकी दिल्यामुळे मुलाने घरात हा प्रकार सांगितलाच नाही. मात्र, दोन दिवसांनी पुन्हा त्याने ‘तसा’ प्रकार करण्यासाठी त्याला दुकानात बोलविले. त्यावेळी मात्र मुलाने हा घृणास्पद प्रकाराची माहिती त्याच्या वडिलांना रडवेल्या अवस्थेतच सांगितली. वडिलांनी या बाबतची खातरजमा करुन याप्रकरणी २७ सप्टेंबर रोजी श्रीनगर पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दिनेश चव्हाण यांच्या पथकाने नाडार याला त्याच्या दुकानातून २७ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास अटक केली. त्याने आणखी असे प्रकार केले आहेत का? याचाही शोध घेण्यात येत आहे.