विनाकारण मारहाण; पप्पी गवळी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 04:50 AM2018-10-22T04:50:49+5:302018-10-22T04:50:57+5:30

रुग्णालयात उपचार घेत असलेल्या आपल्या मुलीला औषध आणण्यासाठी गेलेल्या गणेश पाटील यांच्यासह इतर तिघांना पप्पी उर्फ प्रथमेश गवळी याने शनिवारी रात्री लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करत रक्तबंबाळ केले.

Unnecessary assault; Pappi Gawali Ghazaad | विनाकारण मारहाण; पप्पी गवळी गजाआड

विनाकारण मारहाण; पप्पी गवळी गजाआड

googlenewsNext

कल्याण : रुग्णालयात उपचार घेत असलेल्या आपल्या मुलीला औषध आणण्यासाठी गेलेल्या गणेश पाटील यांच्यासह इतर तिघांना पप्पी उर्फ प्रथमेश गवळी याने शनिवारी रात्री लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करत रक्तबंबाळ केले. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी पप्पी गवळीला अटक केली आहे.
पूर्वेतील मलंग रोड परिसरातील एका खासगी रुग्णालयात गणेश पाटील यांची मुलगी दाखल आहे. तिला औषध आणण्यासाठी पाटील शनिवारी रात्री १० च्या सुमारास रुग्णालयाखाली आले होते. त्यावेळी पप्पी तीन-चार जणांना लाकडी दांडक्याने मारहाण करत होता. नक्की काय सुरू आहे, हे पाहण्यासाठी पाटील गेले असता पप्पीने त्यांनादेखील लाकडी दांडक्याने मारण्यास सुरुवात केली. या घटनेची माहिती मिळताच मानपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पप्पीला ताब्यात घेतले. त्यामुळे पाटीलसह इतरांचा जीव वाचला. पोलिसांनी पप्पीविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. कल्याण पूर्वेतील चक्कीनाका, मलंग रोड परिसरात पप्पी उर्फ प्रथमेश गवळी याची दहशत पसरत चालली आहे. क्षुल्लक कारणावरून मारहाण केल्याप्रकरणी त्याच्यावर डझनभर गुन्हे दाखल आहेत. पप्पीविरोधात पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.

Web Title: Unnecessary assault; Pappi Gawali Ghazaad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :kalyanकल्याण