असंघटीत कामगार - महिला कामगारांच्या ‘श्रम योगी मानधन’ योजनेसाठी जिल्हा परिषदेने घेतली कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2019 06:12 PM2019-03-07T18:12:07+5:302019-03-07T18:16:11+5:30

केंद्र शासनाची महत्वकांक्षी असणाऱ्या प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेचा लाभ तळागाळातील असंघटीत क्षेत्रात काम करणा-या कामगारांना प्राधान्याने मिळवून देणे गरजेचे आहे. यासाठी जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या कामांच्या ठिकाणी जनजागृती करणे अपेक्षित आहे. याच्या सखोल मार्गदर्शनासाठी जिल्हा परिषदेने असंघटीत कामगारासाठी कार्यशाळा घेतली. घरामधून व्यवसाय चालविणारे, रस्त्यवर दुकान लावणारे दुकानदार, प्लंबर, टेलर, शिंपी, गिरणी कामगार,

Unorganized Worker - Workshop taken by Zilla Parishad for the 'Labor Yogi Mansa' scheme of women workers | असंघटीत कामगार - महिला कामगारांच्या ‘श्रम योगी मानधन’ योजनेसाठी जिल्हा परिषदेने घेतली कार्यशाळा

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यशाळा

Next
ठळक मुद्देलाभार्थांचे वय १८ ते ४० वर्ष दरम्यान असणे अपेक्षित आहेकेंद्र शासनाची महत्वकांक्षी असणाऱ्या प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेचा लाभ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यशाळा

ठाणे: जिल्ह्यातील असंघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या संघटना, संस्था तसेच कार्यकर्ते यांच्यासाठी प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेची कार्यशाळा पार पडली. ठाणेजिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागासह कामगार संघटनांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली ही कार्यशाळा यशवंतराव सभागृहात गुरूवारी घेण्यात आली.
केंद्र शासनाची महत्वकांक्षी असणाऱ्या प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेचा लाभ तळागाळातील असंघटीत क्षेत्रात काम करणा-या कामगारांना प्राधान्याने मिळवून देणे गरजेचे आहे. यासाठी जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या कामांच्या ठिकाणी जनजागृती करणे अपेक्षित आहे. याच्या सखोल मार्गदर्शनासाठी जिल्हा परिषदेने असंघटीत कामगारासाठी कार्यशाळा घेतली. घरामधून व्यवसाय चालविणारे, रस्त्यवर दुकान लावणारे दुकानदार, प्लंबर, टेलर, शिंपी, गिरणी कामगार, रिक्षा चालक, शेतमजूर, बांधकाम कामगार, बीडी कामगार, हातमाग कामगार, अंगणवाडी सेविका, मदतनीस, मनरेगामध्ये काम करणारे कामगार, भूमीहीन मजूर, महिला स्वयंसहायत्ता संघातील सदस्य महिला आदी असंघटीत क्षेत्रातील कामगारांना या योजनेचा लाभ प्राधान्याने दिला जात आहे.
केंद्र शासनाच्या या प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेचा लाभ असंघटीत कामगारांना देण्यासाठी जिल्हह्यातील विविध संघटना सक्रिय झाल्या आहेत. या योजनेचा लाभ घेण्याकरीता लाभार्थांचे वय १८ ते ४० वर्ष दरम्यान असणे अपेक्षित आहे. कामगारांसाठी या योजनेला वंचितांपर्यत पोहोचवण्यासाठी व त्यांच्यातील जनजागृतीच्या मार्गदर्शनासाठी जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राधेश्याम आडे यांच्या पुढाकारासह राष्ट्रीय संघटन सचिव भारतीय बंजारा समाज कर्मचारी सेवा संस्था आणि भारतीय सेवा नाका कामगार संघटनेचे भास्कर राठोड यांच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा घेण्यात आली. केंद्र सरकारच्या पी पी एफ विभागाचे रहुप शेख साहेब व उषा सोडे यांनी देखील योजने संदर्भात माहिती दिली, सहाय्यक कामगार आयुक्त स्मिता साबळे यांनी योजनेची पाश्वभूमी सांगितली. यावेळी जिल्हा परिषदेच्या प्रकल्प संचालक रूपाली सातपुते, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नेमाने सेवा ग्रूपचे संचालक मंगल चव्हाण, विमुक्त भटक्या सामाजिक संघटनेचे सुंदरलाल डांगे आदींसह सुमारे संघटनांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
...........
फोटो - ०७ ठाणे कामगार कार्यशाळा ा

Web Title: Unorganized Worker - Workshop taken by Zilla Parishad for the 'Labor Yogi Mansa' scheme of women workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.