गेले मांजर वाचवायला अन् सोडवले आत्महत्या करणाऱ्याला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2020 11:52 PM2020-09-28T23:52:05+5:302020-09-28T23:52:16+5:30
ठाणे अग्निशमन दलाची तत्परता : लुईसवाडी येथील तरुणाचे वाचवले प्राण
ठाणे : नारळाच्या झाडावर मांजर अडकले म्हणून त्याला वाचवण्यासाठी गेले असता, तेथे गळफास घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या ३८ वर्षांच्या व्यक्तीला अग्निशमन दलाने वाचवल्याचा प्रकार घडला आहे. रविवारी ठाण्यातील लुईसवाडी परिसरात आत्महत्येच्या प्रयत्नात असलेल्या व्यक्तीला वागळे इस्टेट पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
रविवारी रात्री ठाणे अग्निशमन दलाला गरोडिया अपार्टमेंट, लुईसवाडी येथील नारळाच्या झाडावर एक मांजर अडकली असल्याचा कॉल आला होता. अग्निशमन दलाचे जवान तिला वाचवण्यासाठी लुईसवाडी येथे गेले. मांजर झाडावरून खाली उतरवण्याचा प्रयत्न सुरू असताना ओम आनंद सोसायटीतील रहिवाशांनी अग्निशमन दलाला सोसायटीत एक व्यक्ती पंख्याला दोर बांधून आत्महत्या करीत असल्याचे कळवले.
भूषण टिपणीस असे आत्महत्येचा प्रयत्न करणाºया व्यक्तीचे नाव आहे. भूषण हे दुसºया मजल्यावर राहतात. माहिती मिळताच अग्निशमन दलाने दुसºया मजल्यावर पोहोचत रूम नं २०३ मध्ये पंख्याला गळफास लावलेल्या अवस्थेत असलेल्या भूषण यांना खाली उतरवून फास काढला. त्यांना वागळे इस्टेट पोलिसांच्या ताब्यात देऊन त्यांची चौकशी सुरूकेली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्परता दाखवून आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असणाºया एकाचे प्राण वाचवल्यामुळे त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.