मनपाजवळच्या शाळांवर उपेक्षित शिक्षक, वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी ठाण मांडलेल्यांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2017 01:42 AM2017-10-06T01:42:56+5:302017-10-06T01:43:18+5:30

राजकीय पुढा-यांच्या आशीर्वादाने महापालिका, नगरपालिकांजवळच्या शाळांवर वर्षानुवर्षे असलेल्या जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना

Untimely teachers on schools near municipal school | मनपाजवळच्या शाळांवर उपेक्षित शिक्षक, वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी ठाण मांडलेल्यांना फटका

मनपाजवळच्या शाळांवर उपेक्षित शिक्षक, वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी ठाण मांडलेल्यांना फटका

Next

ठाणे : राजकीय पुढा-यांच्या आशीर्वादाने महापालिका, नगरपालिकांजवळच्या शाळांवर वर्षानुवर्षे असलेल्या जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना या आॅनलाइन बदल्यांद्वारे पायउतार व्हावे लागत आहे. त्यांच्या जागी जिल्ह्यातील आदिवासी, दुर्गम भागात वर्षानुवर्षे काम करणारे उपेक्षित अपंग शिक्षक, पती-पत्नी एकत्रिकीकरणाचे शिक्षक, विधवा आणि परित्यक्ता आदी शिक्षकशिक्षिकांची प्राधान्याने बदली झाली आहे. यामुळे शहर सोडून ग्रामीण, आदिवासी-दुर्गम भागांत सुमारे ३७४ शिक्षकांच्या बदल्या निश्चित झाल्या आहेत.
या आॅनलाइन बदल्यांमध्ये कल्याण तालुक्यातील शहरी भागाजवळील सुमारे १०० शिक्षकांची उचलबांगडी झाली आहे. याप्रमाणेच अंबरनाथ तालुक्यातील ४४, भिवंडीमधील ५२ शिक्षकांची शहरी भागांजवळच्या शाळांमधून बदली होत आहे. त्यांच्या जागी शहापूर तालुक्यातील १३१ व मुरबाडमधील ४७ शिक्षकशिक्षिकांची मनपा-नगरपालिका शहराजवळच्या शाळांमध्ये प्राधान्यक्रमाने बदली होत आहे. या शिक्षकांमध्ये सुमारे ३७४ शिक्षकांचा समावेश आहे.
राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या २७ फेब्रुवारीच्या अध्यादेशानुसार या आॅनलाइन बदल्यांची यादी नुकतीच जाहीर झाली आहे. त्यातील शिक्षकांना पसंतीच्या शाळांची नावेदेखील आॅनलाइन मागवून घेतली आहेत. या बदल्या जिल्ह्यांतर्गत होत आहेत. या बदल्यांसाठी चार संवर्गांत शिक्षकांची विभागणी केली आहे. यामध्ये अपंग, विधवा व ५३ वर्षांपेक्षा जास्त वयोमानाच्या शिक्षकांचा प्रथम संवर्र्ग, तर मुख्यालयापासून ३० किलोमीटर अंतरावरील पतीपत्नी एकत्रिकीकरणाचा दुसरा संवर्ग आणि अवघड क्षेत्रातील शाळा या तीन क्रमांच्या संवर्गांमधील आहेत. या शाळांमधील शिक्षकांनी मनपा व नगरपालिकांच्या शहराजवळच्या पसंतीच्या शाळांची मागणी केली आहे. त्यामुळे चौथ्या संवर्गात मोडणाºया शहराजवळील शाळांमधील शिक्षकांची तडकाफडकी आॅनलाइन बदली झाली आहे.

Web Title: Untimely teachers on schools near municipal school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.