उल्हासनगर महापालिकेच्या प्रदूषण तक्रारी अँपचे अनावरण, प्रदूषण जनजागृती मोहीम तेज

By सदानंद नाईक | Published: September 11, 2023 06:29 PM2023-09-11T18:29:42+5:302023-09-11T18:30:28+5:30

उल्हासनगर : केंद्र शासनाच्या वने, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागामार्फत राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रम गेल्या आठवड्यात महापालिकेने साजरा केल्यानंतर, ...

Unveiling of Ulhasnagar Municipal Corporation Pollution Complaints App, Pollution Awareness Campaign Tej | उल्हासनगर महापालिकेच्या प्रदूषण तक्रारी अँपचे अनावरण, प्रदूषण जनजागृती मोहीम तेज

उल्हासनगर महापालिकेच्या प्रदूषण तक्रारी अँपचे अनावरण, प्रदूषण जनजागृती मोहीम तेज

googlenewsNext

उल्हासनगर: केंद्र शासनाच्या वने, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागामार्फत राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रम गेल्या आठवड्यात महापालिकेने साजरा केल्यानंतर, हवेतील प्रदुषण व इतर प्रदूषणाशी संदर्भात तक्रारीचे जलदगतीने निवारण होण्याच्यादृष्टीने तक्रारी स्विकारण्यासाठी मोबाईल अँपचे अनावरण आमदार बालाजी किणीकर, गणपत गायकवाड यांच्या उपस्थित सोमवारी झाले. नागरिक प्रदूषण बाबतच्या थेट तक्रारी अँपवर करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

 उल्हासनगर महापालिका आयुक्त अजीज शेख, उपायुक्त डॉ. सुभाष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरण विभागप्रमुख विशाखा सावंत यांनी शहरातील नागरीकांच्या हवतील प्रदुषण तसेच इतर प्रदूषणाशीसंदर्भात तक्रारीचे जलदगतीने निवारण होण्यासाठी मोबाईल अँप तयार केले आहे. सोमवारी महापालिका मुख्यालयातील स्थायी समिती सभागृहात आमदार गणपत गायकवाड, बालाजी किणीकर यांच्याहस्ते सदर मोबाईल अपचे अनावरण करण्यात आले. त्यावेळी सदर कार्यक्रमाच्या ठिकाणी माजी महापौर मिना आयलानी, शिवसेना शिंदे गटाचे महानगरीप्रमुख राजेंद्र चौधरी, भाजपचे शहरजिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी, माजी नगरसेवक अमर लुंड, दिलीप गायकवाड, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, उपायुक्त अशोक नाईकवाडे, कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा परमेश्वर बुडगे. MIDC चे अधिकारी, पाणीपुरवठा विभागाचे इतर कर्मचारी, जनसंपर्क अधिकारी छाया डांगळे आदीजन उपस्थित होते.

 सदर कार्यक्रम दरम्यान हवेतील प्रदुषण तसेच इतर प्रदूषणाशी संबंधित तक्रारी अनावरण केलेल्या मोबाईल अपद्वारे कशापध्दतीने कार्य करतील याचीदेखील माहिती पर्यावरण विभागामार्फत सर्व उपस्थितांना देण्यात आली. यामध्ये नागरीकांना सदर अप डाऊनलोड करून त्यावर तक्रार दाखल करता येणार आहे. सदर तक्रार विभागाकडून संबंधित इतर विभागांकडे वर्ग करण्यात येणार आहे. यामध्ये संबंधित तक्रार निकाली काढण्यासाठी विभागांना कालावधी निश्चित करून देण्यात येणार आहे. त्या कालावधीत प्राप्त तक्रार निकाली निघणे आवश्यक राहिल. याद्वारे प्रदुषणाशी संबंधित तक्रारींचा निपटारा जलद गतीने होणार असल्याची माहिती उपायुक्त डॉ. सुभाष जाधव यांनी दिली आहे.

Web Title: Unveiling of Ulhasnagar Municipal Corporation Pollution Complaints App, Pollution Awareness Campaign Tej

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.