यूपीएमुळे इंधनदरवाढ नाही, माहिती अधिकारात उघड, भाजपाचे नेटीझन पडले उघडे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2018 02:44 AM2018-08-12T02:44:01+5:302018-08-12T02:44:27+5:30

क्रूड आॅइलखरेदीसाठी यूपीए सरकारने इराणकडून घेतलेले कोट्यवधींचे कर्ज भाजपा सरकार फेडत आहे. त्यामुळे भारतात पेट्रोल व डिझेलचे दर महागले आहेत. ते कमी करता येत नाहीत, असा प्रचार सोशल मीडियावर भाजपा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भक्त असलेले नेटीझन करत आहेत.

The UPA did not increase the fuel, the information was disclosed in the RTI | यूपीएमुळे इंधनदरवाढ नाही, माहिती अधिकारात उघड, भाजपाचे नेटीझन पडले उघडे

यूपीएमुळे इंधनदरवाढ नाही, माहिती अधिकारात उघड, भाजपाचे नेटीझन पडले उघडे

Next

- मुरलीधर भवार
कल्याण : क्रूड आॅइलखरेदीसाठी यूपीए सरकारने इराणकडून घेतलेले कोट्यवधींचे कर्ज भाजपा सरकार फेडत आहे. त्यामुळे भारतात पेट्रोल व डिझेलचे दर महागले आहेत. ते कमी करता येत नाहीत, असा प्रचार सोशल मीडियावर भाजपा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भक्त असलेले नेटीझन करत आहेत. याबाबतचे सत्य शोधण्यासाठी श्रीनिवास घाणेकर यांनी माहिती अधिकारात तपशील मागितला असता इंधनदरवाढीस यूपीए सरकार जबाबदार नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे हा प्रचारच पूर्णत: खोटा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
क्रूड आॅइलच्या खरेदीच्या बदल्यात इराणला भारताकडून किती देणे बाकी आहे, असा तपशील माहिती अधिकारात या चळवळीतील कार्यकर्ते घाणेकर यांनी प्रथम केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयाकडे आॅनलाइनद्वारे विचारला. त्यावर त्या मंत्रालयाकडून माहिती देण्यास नकार आला. घाणेकर यांनी इंडियन आॅइल, भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम या कंपन्यांच्या महामंडळाकडे माहिती अधिकारात अर्ज केला. इंडियन आॅइल कंपनीने दोन देशांतील व्यापाराविषयीसंदर्भात असलेली माहिती देता येत नाही, असे कळवले. मात्र, इराणला कंपन्यांकडून काही देणे लागत नाही. अशा प्रकारचे कोणतेही थकीत कर्ज नाही, असे भारत पेट्रोलियम व हिंदुस्थान पेट्रोलियम कंपन्यांनी घाणेकर यांना कळवले.
घाणेकर म्हणाले की, यूपीए सरकारच्या काळात क्रूड आॅइलची किंमत प्रतिबॅरल १२५ ते १२७ डॉलर होती. त्यावेळी भारतात पेट्रोलचे दर प्रतिलीटरला ७० ते ७५ रुपये होेते. तर, डिझेलचे दर प्रतिलीटर ४० ते ४५ रुपये होते. यूपीए सरकारने पैशांची परतफेड केली नाही. त्यासाठी कर्ज घेतले. त्याविषयी विद्यमान भाजपा सरकारने कोणताही अधिकृत खुलासा केलेला नाही. तसेच केंद्रीय अर्थमंत्र्यांनी आतापर्यंत सादर केलेल्या अर्थसंकल्पात हा मुद्दा आलेला नाही. त्याचा साधा उल्लेखही लोकसभा व राज्यसभेत झालेला नाही. त्यामुळे यूपीए सरकारमुळे इंधनदरवाढ झाली, हा प्रचार मुळात चुकीचा आहे. हे माहिती अधिकारात स्पष्ट झाले आहे.

चुकीच्या प्रचारासाठी वापर

भाजपाने सत्तेवर येण्यापूर्वी काँग्रेस सरकारविरोधात जोरदार प्रचार केला. त्यासाठी सगळ्यात जास्त सोशल मीडियाचा वापर झाला. नेटीझनचे अनेक ग्रुप आहेत. एका नेटीझनला प्रतिएसएमएस करण्याच्या बदल्यात पैसे मिळतात.

हजारो लोक एकाच वेळी मेसेज करतात. त्यामुळे एक मत तयार होते. याचा सर्रासपणे वापर चुकीच्या प्रचारासाठी केला जातो, याकडे घाणेकर यांनी लक्ष वेधले आहे.
 

Web Title: The UPA did not increase the fuel, the information was disclosed in the RTI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.