उल्हासनगरातील सीएचएम महाविद्यालयातील ग्रंथालय अध्यावत करा; युवासेनेचे निवेदन
By सदानंद नाईक | Published: September 30, 2022 05:08 PM2022-09-30T17:08:46+5:302022-09-30T17:18:44+5:30
याबाबत शिक्षण मंडळासह वरिष्ठकडे विध्यार्थ्यांसाठी दाद मागणार असल्याचे सांगून आंदोलनाचा इशारा यांनी दिला.
सदानंद नाईक
उल्हासनगर: शहरातील सीएचएम महाविद्यालय ग्रंथालयात पुस्तके उपलब्ध नसणे, वेळेची मर्यादा आदी समस्या मांडण्यासाठी युवासेनेने (शिंदे गट) प्राचार्य यांची भेट घेऊन निवेदन दिल्याची माहिती पदाधिकारी सुशील पवार यांनी दिली. तसेच याबाबत शिक्षण मंडळासह वरिष्ठकडे विध्यार्थ्यांसाठी दाद मागणार असल्याचे सांगून आंदोलनाचा इशारा पवार यांनी दिला.
उल्हासनगरातील प्रसिद्ध सीएचएम महाविद्यालयात गेल्या ३ वर्षापासून शिक्षण व्यवस्थे बाबत विध्यार्थ्यांच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी युवासेनेच्या पदाधिकारी यांनी प्राचार्य यांची भेट घेऊन निवेदन देऊन विध्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणे सुखसुविधा देण्याची मागणी केली. अशी माहिती युवासेनेचे सुशील पवार यांनी दिली आहे. सीएचएम कॉलेज मधील ग्रंथालया मध्ये चालू वर्षाचे तसेच नवीन अभ्यासक्रमाचे गेल्या २ वर्षापासून पुस्तके उपलब्ध नाही आहेत, ते तत्काळ उपलब्ध करून द्यावेत, यासह बी.ए, बी.कॉम, बी.एस.सी, त्यापुढील अभ्यासक्रमाची पुस्तिका उपलब्ध करून द्यावे, ग्रंथालयाचा वेळ वर्ष २०१५ ते २०१७ पर्यंत सकाळी ७ ते संध्याकाळी ८ वाजेपर्यंत असा होता परंतु २०१८ पासून सकाळी ९ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत केला. त्यामुळे वेळ पुन्हा सकाळी ७ ते संध्याकाळी ८ वाजेपर्यंत असा वेळ करावा. इयत्ता ११ वी, १२ वी आर्ट्स, कॉमर्स, सायन्स व बी.ए, बी.कॉम,बी.एस.सी, यांचे देखील चालू वर्षाच्या अभ्यासक्रमाचे पुस्तके उपलब्ध नाही. ते तत्काळ उपलब्ध करून देण्याची मागणी निवेदनात दिली.
महाविद्यालयातील बी.एम.एम, बी.एम.एस, बी.एस.आय.टी या अभ्यासक्रमाचे पुस्तके देखील लायब्ररीमध्ये उपलब्ध करून द्यावेत. २०१५ ते २०१७ पर्यंत बुक बँक ही योजना आपल्या कॉलेजमध्ये गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी सुरू होती. परंतु २०१८ पासून ती सुविधा बंद करण्यात आली आहे ही सुविधा पुन्हा गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात यावी, आदी मागण्या युवासेनेच्या वतीने करण्यात आल्या आहेत. वरील मागण्या तत्काळ पूर्ण करावेत अन्यथा आपल्या विरोधात जन आंदोलन उभारण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला. याबाबत महाविद्यालय प्राचार्य व कॉलेज प्रशासनाशी संपर्क केला असता, झाला नाही.