अंबरनाथच्या UPSC उत्तीर्ण पियुष सिंगचा रोटरी क्लब डोंबिवली वेस्टतर्फे सन्मान 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2018 03:56 PM2018-09-30T15:56:06+5:302018-09-30T16:03:40+5:30

रोटरी क्लब ऑफ डोंबिवली वेस्टने आयोजित सत्कार समारंभात बोलताना अंबरनाथचा रहिवासी असलेला पियुष सिंग यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

UPSC Piyush Singh rotary club dombivli west | अंबरनाथच्या UPSC उत्तीर्ण पियुष सिंगचा रोटरी क्लब डोंबिवली वेस्टतर्फे सन्मान 

अंबरनाथच्या UPSC उत्तीर्ण पियुष सिंगचा रोटरी क्लब डोंबिवली वेस्टतर्फे सन्मान 

googlenewsNext

डोंबिवली - ग्रामीण जीवनात दिसून न येणाऱ्या पण संविधानाच्या सरनाम्यात लिहिलेल्या सामाजिक न्याय आणि आर्थिक न्याय या तत्वांचे पालन व्हावे म्हणून मी प्रशासकीय सेवांकडे आकर्षित झालो असं UPSC परीक्षेत उत्तीर्ण झालेला उमेदवार पियुष सिंग यांने म्हटलं आहे. रोटरी क्लब ऑफ डोंबिवली वेस्टने आयोजित सत्कार समारंभात बोलताना अंबरनाथचा रहिवासी असलेला पियुष सिंग यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. रोटरी क्लब ऑफ डोंबिवली वेस्टच्या वतीने अध्यक्ष श्री मनोज क्षीरसागर यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला. सचिव मेहुल गोर यांनी आभार प्रदर्शन केले. मुलांच्या यशात पालकांचा वाट सुद्धा मोठा असतो. या निमित्ताने पियुष सिंग यांच्या आईचाही  सत्कार डॉ. वनिता क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आला.     

पियुष सिंग यांची  २०१७ च्या बॅच मध्ये निवड झाली आहे. त्यांने UPSC परीक्षेचा विचार करताना माझी प्रशासकीय सेवा हीच पहिली प्राथमिकता होती आणि म्हणून DANICS ही आपली प्राथमिकता फॉर्म भरतानाच आपण ठरवली असल्याचं सांगितलं. माझ्या या प्रवासात शाळेत म्हणत असलेला वचननामा प्रत्यक्षात आणण्यासाठी आपण प्रयत्नशील राहायला हवं अशी जाणीव सातत्याने होती. आय ए एस सारख्या ध्येयाचा पाठपुरावा करताना स्वयंप्रेरणा सगळ्यात महत्वाची असते. आय ए एस चे ध्येय हे अर्थपूर्ण करिअर आहे. याची जाणीव ठेवून आपली पूर्ण ऊर्जा याच ध्येयासाठी खर्च करायला हवी. महाविद्यालयीन अभ्यासावर कुठेही तडजोड न करता एक अधिकारी म्हणून आपले व्यक्तिमत्व घडवणे हे अधिक आवश्यक आहे. या परीक्षेचा अभ्यास करताना आपलं ध्येय निश्चित माहिती असेल तर अपयशाने आपण खचून जात नाही. विशिष्ट पद्धतीने अभ्यास केला तर यश निश्चित मिळते. मुलाखतीचा अनुभव विद्यार्थ्यांसमोर मांडताना त्यांनी अत्यंत ज्ञानी आणि अनुभवी असे पॅनल आपली मुलाखत घेत असते, त्यांना फसवण्याचा विचारही करू नका असाही सल्ला दिला.

यशस्वी मुलाखतीसाठी स्वतः ला पूर्णपणे ओळखणं आवश्यक आहे. विचारात स्पष्टता असेल तर ती  लिखाणात उतरते आणि सहज गुण मिळतात. असा कानमंत्रही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. स्वतः ला सातत्याने सुधारत यशाचा सोपा मार्ग चढता येतो असा विचार पियुष सिंग याने विद्यार्थ्यांना दिला. या प्रसंगी पियुष सिंग यांचे मार्गदर्शक आणि ध्रुव आय ए एस अकॅडमीचे संचालक विनोद देशपांडे यांनी आपला दृष्टीकोन आणि मेहनतीसाठी तयारी या गोष्टी यशासाठी अत्यंत आवश्यक आहेत. आपल्या व्यक्तिमत्वानुसार प्रशासकीय सेवांमध्ये करिअरच्या संधी उपलब्ध आहेत त्यानुसार महाविद्यालयीन जीवनापासूनच तयारी करायला हवी असे मतप्रदर्शन केले.  या सत्कार समारंभाला रोटेरियन श्रीपाद कुलकर्णी, संजय टेम्बे , सुदीप साळवी डॉ. प्रल्हाद देशपांडे, दीपक काळे, दिपाली पाठक,विनायक शेट्ये आणि इतर  रोटेरियन सुद्धा उपस्थित होते.
 

Web Title: UPSC Piyush Singh rotary club dombivli west

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.