UPSC Result 2022: ठाण्याची डॉ. कश्मिरा संखे यूपीएससी परीक्षेत राज्यात पहिली...
By प्रज्ञा म्हात्रे | Published: May 23, 2023 04:28 PM2023-05-23T16:28:43+5:302023-05-23T16:35:47+5:30
UPSC Result 2022: आज यूपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यात ठाण्याच्या डॉ.काश्मिरा संखे यांनी राज्यात प्रथम क्रमांक मिळवत ठाणेकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवलाय.
- प्रज्ञा म्हात्रे
ठाणे - आज यूपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यात ठाण्याच्या डॉ.काश्मिरा संखे यांनी राज्यात प्रथम क्रमांक मिळवत ठाणेकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवलाय.त्या स्वतः एक डॉक्टर असून डेंटिस्ट आहेत.स्वतःच्या डॉक्टर चा व्यवसाय सांभाळून त्यांनी हे यश मिळवलं आहे...आपल्या या यशाचं श्रेय त्यानी आपल्या आईवडलांना दिल असून आता IAS ऑफिसर बनून देशाची सेवा करणार आल्याचं त्यांनी सांगितलं.
या वर्षीचा युपीएससीचा निकाल जाहीर झाला आहे. या वर्षीच्या पहिल्या चारमध्ये मुलींनी बाजी मारली आहे. इशिता किशोर यंदाच्या UPSC परीक्षेत UPSC 2022 ची टॉपर ठरली आहे. भारतातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक, UPSC CSE परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. नागरी सेवकांची निवड करण्यासाठी घेण्यात आलेल्या या परीक्षेत मुलींनी अव्वल ४ पदांवर स्थान मिळवले आहे. इशिता किशोरशिवाय गरिमा लोहिया दुसऱ्या क्रमांकावर, उमा हर्थी एन तिसऱ्या आणि स्मृती मिश्रा चौथ्या क्रमांकावर आहे.