नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची कोरोनावर मात, रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2020 05:05 PM2020-10-04T17:05:31+5:302020-10-04T17:07:59+5:30

Eknath Shinde : राज्याचे नगर विकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती . त्यांच्यावर ठाण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.

Urban Development Minister Eknath Shinde beat Corona and was discharged from the hospital | नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची कोरोनावर मात, रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची कोरोनावर मात, रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

googlenewsNext

 ठाणे - ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रविवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. २४ सप्टेंबरला त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. १० दिवस उपचार घेतल्यावर रविवारी त्यांना डिस्चार्ज मिळाला. यावेळी पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनीही त्यांचे स्वागत केले.


राज्याचे नगर विकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती . त्यांच्यावर ठाण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान, आज अखेरीस त्यांनी कोरोनावर मात केली.



मंत्री शिंदे यांच्या स्वास्थ्यासाठी आमदारांनी उघडले मंदिर!

कोरोनामुळे देशातील सर्व धार्मिक स्थळे बंद असताना मुक्ताईनगरचे आमदार चंद्र्कांत पाटील यांनी बोदवड तालुक्यातील प्रसिद्ध शिरसाळा हनुमान मंदिर गुरुवारी उघडून बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी चक्क होम हवन व पूजा तसेच आरती केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. एकनाथ शिंदे कोरोनातून मुक्त व्हावेत म्हणून आ. पाटील यांनी मंदिर उघडून होम हवन केले. तसा व्हिडिओ व्हायरल होताच सोशल मीडियात जोरदार टीका झाली. तर मंदिराच्या प्रांगणात होम व आरती केली. नियमांचे पालन केले आहे, जो व्हिडीओ व फोटो व्हायरल होत आहे तो जुना असल्याचे पाटील म्हणाले होते.

 

 

 

Web Title: Urban Development Minister Eknath Shinde beat Corona and was discharged from the hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.