उरलेसुरले खासदार, आमदार शिंदेंकडे येणार; शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2023 05:43 AM2023-05-12T05:43:26+5:302023-05-12T05:43:41+5:30

विधानसभेच्या निवडणुका या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच लढविण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.

Urlesurle MP, MLA will come to Shinde; Shiv Sena spokesperson Naresh Mhaske claimed | उरलेसुरले खासदार, आमदार शिंदेंकडे येणार; शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांचा दावा

उरलेसुरले खासदार, आमदार शिंदेंकडे येणार; शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांचा दावा

googlenewsNext

ठाणे : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार शिंदे, फडणवीस सरकारला दिलासा मिळाल्यानंतर आता ठाकरे गटातील उरलेसुरले आमदार आणि खासदारही आमच्याकडे येतील. त्याचसोबत राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर असून, महाविकास आघाडीतील आमदारही आमच्या संपर्कात असल्याचा दावा शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केला. येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच लढविण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.

न्यायालयाच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गड असलेल्या ठाण्यात कार्यकर्त्यांमध्ये निकालाबाबत उत्सुकता होती. निकाल लागल्यानंतर ठाण्यात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले. 

राऊत सकाळचा भोंगा

खा. संजय राऊत यांचा ‘सकाळचा भोंगा’ असा उल्लेख करीत जे लोक सरकार पायउतार होणार असे बोलत होते त्यांना या निकालानंतर मोठी चपराक बसली आहे. राऊत यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव टिपायला हवेत, विरोधकांकडून केवळ सहानुभूतीपोटी टीका केली जात असल्याचेही म्हस्के यांनी सांगितले. दरम्यान, येणाऱ्या विधानसभेची निवडणूक ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच लढली जाणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे. उद्धव ठाकरे यांना ५० आमदार सांभाळता आले नाहीत, आता उरलेले आमदार आणि खासदारांसमवेत महाविकास आघाडीतील आमदार आमच्या संपर्कात आहेत. 

Web Title: Urlesurle MP, MLA will come to Shinde; Shiv Sena spokesperson Naresh Mhaske claimed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.