आंबेडकर स्मारकाचा निवडणुकीपुरता वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 06:58 AM2017-12-02T06:58:17+5:302017-12-02T06:59:08+5:30
निवडणुका आल्या, की मते मिळविण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचा वापर केला जातो, अशी टीका मोहने येथे आयोजित राज्यस्तरीय आंबेडकर साहित्य संमेलनात शुक्रवारी करण्यात आली.
कल्याण : निवडणुका आल्या, की मते मिळविण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचा वापर केला जातो, अशी टीका मोहने येथे आयोजित राज्यस्तरीय आंबेडकर साहित्य संमेलनात शुक्रवारी करण्यात आली. आमच्यात गटबाजी असेल, पण समाजाला हात लावाल तर हे सरकार पाडल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
साहित्य परिषदेची ठाणे जिल्हा शाखा आणि नालंदा बुध्द विहाराने महात्मा फुले साहित्यनगरीत हे एकदिवसीय संमेलन आयोजित केले होते. संविधान यात्रेने त्याची सुरूवात झाली. आंबेडकरांचा अपमान केल्यास आम्ही काय करतो हे रमाबाई आंबडेकरनगर प्रकरणातून सगळ््यांनी पाहिले आहे, असा इशारा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी उद््घाटनावेळी दिला. यावेळी व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष भालचंद्र मुणगेकर, दुग्धविकासमंत्री महादेव जानकर, महापौर राजेंद्र देवळेकर,आमदार नरेंद्र पवार, साहित्यिक जयप्रकाश घुमटकर, श्रीरंग कुडुक, ललिता गवांदे, नगरसेविका शीतल गायकवाड, महेंद्र गायकवाड, शरद गोेरे आदी मान्यवर उपस्थित होते. डोंबिवलीचा बुध्दीबळपट्टू आर्यन जोशी याला आठवले यांच्या हस्ते एक लाखांची मदत देण्यात आली.
देशात काळा पैसा वाढू नये असे वाटत असेल, तर दर १० वर्षांनी चलन बदलण्याची सूचना डॉ. आंबेडकरांनी केली होती, याचा दाखला देत आठवले म्हणाले, मोदींनी तो बदल केला. आपल्या आरक्षणाला कोणी हात लावणार नाही. त्याची चिंता करू नका, असे आश्वासन त्यांनी दिले.
कोपर्डी प्रकरणात मी सर्वप्रथम तेथे गेलो, असे सांगून डॉ. मुणगेकर म्हणाले, मी फाशीच्या विरोधात असलो, तरी कोपर्डीतील आरोपींना फाशीची शिक्षा झाल्याचा मला आनंद झाला. पण कोपडीच्या निकालानंतर जो आनंद व्यक्त करणाºया समाजाने मराठा तरूणीवर प्रेम केले म्हणून हत्या झालेल्या नितीन आगे या दलित तरूणाच्या खटल्यातील आरोपी सुटल्यावेळी दु:ख व्यक्त केले नाही. याची चर्चा आंबेडकरी संमेलनाच्या व्यासपीठावरुन होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
आमदार नरेंद्र पवार यांनी एनआरसी कामगारांचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले; तर महापौर राजेंद्र देवळेकर यांनी मोहोने येथील रूग्णालयासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
... तर आठवले मुख्यमंत्री!
म्हणून कर्जमाफीला उशीर : जानकर
सरकारने शेतकºयांची ३४ कोटीची कर्जे माफ केली. पण ती चुकीच्या माणसाच्या हातात जाऊ नये म्हणून त्याला वेळ लागत असल्याचा दावा मंत्री महादेव जानकर यांनी केला.
संमेलनात पाच ठराव
इंदू मिलच्या जागेतील आंबडेकरांचे स्मारक तातडीने उभारावे.
मोहनेतील एनआरसीच्या कामगारांना थकीत देणी द्यावी.
राज्य सरकारने शेतकºयांना व्याजासह कर्जमाफी देत सातबारा कोरा करावा.
मुंबई विद्यापीठात लक्ष घालून विद्यार्थ्याना दिलासा द्यावा.
मोहने येथे सामान्यांसाठी रुग्णालय उभारावे.