बोटात अडकलेली अंगठी काढताना ग्राईंडरचा वापर; हॉस्पीटलच्या सहाय्यकावर गुन्हा 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2021 02:36 PM2021-08-17T14:36:01+5:302021-08-17T16:37:10+5:30

Use of grinder when removing ring stuck in finger : विशेष म्हणजे, हा प्रकार घडल्यानंतरही रुग्णालयाने उपचारासाठी पैसे उकळल्याचा आरोप होत आहे.

Use of grinder when removing ring stuck in finger; Crime on hospital assistant after MNS pursuit | बोटात अडकलेली अंगठी काढताना ग्राईंडरचा वापर; हॉस्पीटलच्या सहाय्यकावर गुन्हा 

बोटात अडकलेली अंगठी काढताना ग्राईंडरचा वापर; हॉस्पीटलच्या सहाय्यकावर गुन्हा 

googlenewsNext
ठळक मुद्देहा प्रकार घडल्यानंतर संबधित रुग्णालयाने उपचारासाठी मोठ्या प्रमाणात पैसे उकळल्यानंतर मनसेचे ठाणे शहर सचिव अक्षय करंजवकर पाठपुरावा केला. त्यानंतर हा गुन्हा दाखल केला आहे.

ठाणे :  बोटात अडकलेली अंगठी काढण्यासाठी चक्क ग्राईंडरचा वापर करणार्‍या येथील लेक सिटी रुग्णालयाच्या एका सहाय्यकावर नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, हा प्रकार घडल्यानंतरही रुग्णालयाने उपचारासाठी पैसे उकळल्याचा आरोप होत आहे.


येथील ए विंग, साई वात्सल्य अपार्टमेंट, नितीन कंपनी जवळ,पाचपाखाडी ठाणे येथे राहणारा पार्थ सतीश टोपले ( 14)  याच्या उजव्या हाताच्या बोटामध्ये अंगठी अडकली होती. अगंठी निघत नसल्याने या मुलाची आई  शितल सतीश टोपले यांनी मुलाला ३ जुलैला  खोपट येथील या लेक सिटी रुग्णालयामध्ये दवाउपचारासाठी नेले होते. त्यावेळी एकाही वैद्यकीय अधिकार्‍याने मुलाकडे पाहिले नसून रुग्णालयातील कनिष्ठ वैद्यकीय अधिकार्‍यांने तपासणी करीत औषधे देऊन मुलाला घरी पाठविले, असा आरोप या मुलांच्या मुलांच्या आईकडून केला जात आहे. 

परंतु त्यानंतर याच रुग्णालयातील स्वप्नील होतकर,  या इसमाचा फोन शितल टोपले यांना आला. या इसमाने या रुग्णालयातून बोलत असून रुग्णालय व्यवस्थापनाने मुलाच्या बोटातील अंगठी काढण्यासाठी  पाठविले असल्याचे टोपले, यांना ऐकवल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर हा होतकर घरी आला अन् त्याने धारदार ग्राइंडरचा वापर करुन अंगठी काढण्याचा प्रयत्न केला. पण अंगठी निघत नसल्याने त्याने पार्थ याच्या बोटाला गंभीर दुखापत केल्याचे टोपले यांच्याकडून सांगितले जात आहे. 

मात्र या घटनेनंतर पार्थ याची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्याला कळवा येथील शिवाजी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याला गँगरीन झाल्याचे सांगण्यात आले. यावेळी तेथे त्याच्यावर कांगारू पद्धतीने उपचार करण्यात आले. त्याच्या हातावर, पोटावर शस्त्रक्रिया करुन बोट सुमारे महिनाभर पोटात ठेवले आणि ते आता त्याच्या हाताला जोडण्यात आले आहे. हा घटनाक्रम शितल टोपले, यांनी मनसेचे ठाणे शहर सचिव अक्षय करंजवकर, यांना सांगितला. या घटनेचे गांभीर्य ओळखून करंजवकर यांनी या लेक सिटी रुग्णालयाच्या कनिष्ठ सहाय्यक डाँक्टरवर नौपाडा पोलिसात हा गुन्हा दाखल केला आहे.


या रुग्णालयाच्या बेजबाबदारपणामुळे पार्थ या अवघ्या १४ वर्षाच्या मुलाच्या हाताला गैंगरीन होण्याचा धोका निर्माण झाला आहे. उपचाराच्या नावाखाली त्याच्याकडून लाखो रुपये उकळले. हा घटनाक्रम  सविस्तर टोपले कुटुंबियांनी करंजवकर यांना ऐकवला. त्यानंतर त्यांनी शनिवारी नौपाडा पोलिसांना निवेदन देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. याशिवाय आंदोलनाचा इशाराही दिला होता. या इशार्‍यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या प्रकरणी या रुग्णालयाचा परवाना रद्द करावा; अन्यथा, तीव्र आंदोलन छेडू असा इशाराही करंजवकर यांनी दिला आहे.

Web Title: Use of grinder when removing ring stuck in finger; Crime on hospital assistant after MNS pursuit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.