उल्हासनगर रस्त्यातील खड्डे भरण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, आयुक्तांकडून पाहणी
By सदानंद नाईक | Published: August 13, 2024 01:41 PM2024-08-13T13:41:16+5:302024-08-13T13:41:31+5:30
सोमवारी नेताजी चौकातील रस्त्याचे खड्डे या तंत्रज्ञानातून भरण्यात आले असून आयुक्त अजीज शेख यांनी भरलेल्या खड्ड्याची पाहणी केली.
उल्हासनगर : बृहमुंबई व ठाणे महापालिकेच्या धर्तीवर अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून रस्त्यातील खड्डे भरण्याचा निर्णय महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी घेतला. या तंत्रज्ञानाचा वापर करून सोमवारी नेताजी चौकातील खड्डे भरण्यात आले असून आयुक्त अजीज शेख यांनी खड्डे भरण्याची पाहणी केली.
उल्हासनगरातील रस्त्याची अवस्था दैयनिय झाली असून वाहन चालकासह नागरिक हैराण झाले. वाहन चालक व नागरिकांना दिलासा देण्यासाठी आयुक्त अजीज शेख यांनी मुंबई, ठाणे शहराच्या धर्तीवर अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून रस्त्यातील खड्डे भरण्याचा निर्णय घेतला. सोमवारी नेताजी चौकातील रस्त्याचे खड्डे या तंत्रज्ञानातून भरण्यात आले असून आयुक्त अजीज शेख यांनी भरलेल्या खड्ड्याची पाहणी केली.
हे तंत्रज्ञान परिणामकारक ठरलेतर, हे तंत्रज्ञान रस्त्यातील खड्डे भरण्यासाठीं वापरणार असल्याची प्रतिक्रिया आयुक्त अजीज शेख यांनी दिली. याच आधुनिक तंत्रज्ञान वापरुन छत्रपती शाहू महाराज उड्डाण पुल, चालीया चौक, श्रीराम चौक, धोबीघाट रस्ता व शहाड रस्त्यातील खड्डे भरण्यात येणार असल्याचे संकेत आयुक्तांनी दिली.