अंमली पदार्थांचा वापर, विक्री रोखण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करा - जिल्हाधिकारी

By सुरेश लोखंडे | Published: May 22, 2023 03:59 PM2023-05-22T15:59:26+5:302023-05-22T15:59:33+5:30

जिल्हा पोलीस यंत्रणांमार्फत अंमली पदार्थांचा वापर, विक्री व वाहतूक रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या कार्यवाहीची माहिती यावेळी देशमाने यांनी दिली.

Use technology to curb drug use, sale - thane district Collector | अंमली पदार्थांचा वापर, विक्री रोखण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करा - जिल्हाधिकारी

अंमली पदार्थांचा वापर, विक्री रोखण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करा - जिल्हाधिकारी

googlenewsNext

ठाणे : जिल्ह्यात अंमली पदार्थांचा वापर, विक्री व साठा रोखण्यासाठी पाेलिसांकडून मुरबाड व शहापूर येथील बंद पडलेल्या औद्योगिक वसाहतींमध्ये तपासणी करण्यात येत असल्याची माहिती समाेर आलीआहे. त्यावर ठाणे जिल्हाधिकारी अशाेक शिनगारे यांनी जिल्ह्यातील बंद पडलेले कारखाने, गोदामे येथील तपासणी वाढवा, त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा व इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करा. याशिवाय अंमली पदार्थांच्या वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी यंत्रणा तयार करा, असे निर्देशही त्यांनी आज घेतलेल्या आढावा बैठकीत दिले.

नार्को कोऑर्डिनेशन सेंटर समिती व जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीची बैठक जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली. त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करता जिल्हाधिकारी की, अंमली पदार्थांमुळे तरुणांचे जीवन वाया जात असून त्यांच्या कुटुंबांवर सुद्धा त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे अशा पदार्थांना रोखण्याची आपली जबाबदारी आहे. सर्व विभागांनी सतर्क राहून अंमली पदार्थांच्या वाहतूक, विक्री व सेवनावर आळा घालण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी त्यांनी अधिकार्यांना सांगितले०

जिल्ह्यातील अंमली पदार्था चा शाेध घेण्यासाठी विशेष यंत्रणा तयार करा. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कारखाने, गोदामे आहेत. अशा ठिकाणांचा वापर अंमली पदार्थांच्या निर्मितीसाठी होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशी ठिकाणे शोधून कारवाई करण्यात यावी. उद्योग विभागाकडून जिल्ह्यातील बंद पडलेल्या, वापरात नसलेले कारखाने, गोदामे यांची माहिती घेऊन त्यासाठी सतत लक्ष ठेवण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. संभाव्य जागांवर स्थानिक लक्ष ठेवण्याचे निदेर्शही जिल्हाधिकार्यांनी यावे यावेळी अधिकार्यांना दिले.

या बैठकीला जिल्हा पोलीस अधिक्षक विक्रम देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, जिल्हा शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर, उत्पादन शुल्क अधिक्षक निलेश सांगडे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दीपक कुटे, अन्न व औषध प्रशासनचे सहाय्यक आयुक्त राजेश चौधरी, जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. मृणाली राठोड, वस्तू व सेवाकर अधिक्षक अंबरिश शिंदे, टपाल कार्यालयाच्या सहाय्यक अधिक्षक अमिता कुमारी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक सुरेश मनोरे आदी यावेळी उपस्थित होते.

जिल्हा पोलीस यंत्रणांमार्फत अंमली पदार्थांचा वापर, विक्री व वाहतूक रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या कार्यवाहीची माहिती यावेळी देशमाने यांनी दिली. जिल्ह्यातील मुरबाड व शहापूर येथील औद्योगिक वसाहतींमध्ये तपासणी करण्यात येत असल्याचे या बैठकीत सांगितले. तर बाहेर देशातून येणाऱ्या टपालावर लक्ष ठेवण्यात येत आहे. आता शाळा सुरू झाल्यानंतर शाळांमध्ये विद्यार्थ्यांना माहिती देऊन जनजागृती करण्यात येणार असल्याचे ही देशमाने यांनी या बैठकीत स्पष्ट केले.

Web Title: Use technology to curb drug use, sale - thane district Collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.