अमली पदार्थ विक्री राेखण्यासाठी तंत्रज्ञान वापरा; ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकाऱ्यांना सूचना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2023 01:20 PM2023-05-24T13:20:05+5:302023-05-24T13:20:11+5:30

नार्को कोऑर्डिनेशन सेंटर समिती व जिल्हास्तरीय अमली पदार्थविरोधी कार्यकारी समितीची बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली साेमवारी पार पडली.

Use technology to track drug sales; Instructions to Thane District Collector Officers | अमली पदार्थ विक्री राेखण्यासाठी तंत्रज्ञान वापरा; ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकाऱ्यांना सूचना 

अमली पदार्थ विक्री राेखण्यासाठी तंत्रज्ञान वापरा; ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकाऱ्यांना सूचना 

googlenewsNext

लाेकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : जिल्ह्यात अमली पदार्थांचा वापर, विक्री व साठा रोखण्यासाठी पाेलिसांकडून मुरबाड व शहापूर येथील बंद पडलेल्या औद्योगिक वसाहतीत तपासणी करण्यात येत असल्याची माहिती उघड झाली आहे. त्यावर ठाणे जिल्हाधिकारी अशाेक शिनगारे यांनी जिल्ह्यातील बंद पडलेले कारखाने, गोदामे येथील तपासणी वाढवा. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा व इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करा. याशिवाय अमली पदार्थांच्या वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी यंत्रणा तयार करा, असे निर्देशही त्यांनी साेमवारी आढावा बैठकीत दिले.

नार्को कोऑर्डिनेशन सेंटर समिती व जिल्हास्तरीय अमली पदार्थविरोधी कार्यकारी समितीची बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली साेमवारी पार पडली. त्यावेळी उपस्थितांना त्यांनी मार्गदर्शन केले.
या बैठकीला जिल्हा पोलिस अधीक्षक विक्रम देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, जिल्हा शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर, उत्पादन शुल्क अधीक्षक नीलेश सांगडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दीपक कुटे, अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त राजेश चौधरी, जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. मृणाली राठोड, वस्तू व सेवाकर अधीक्षक अंबरीश शिंदे, टपाल कार्यालयाच्या सहायक अधीक्षक अमिता कुमारी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुरेश मनोरे आदी उपस्थित होते. जिल्हा पोलिस यंत्रणांमार्फत अमली पदार्थांचा वापर, विक्री व वाहतूक रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या कार्यवाहीची माहिती देशमाने यांनी दिली.

अमली पदार्थांमुळे तरुणांचे नुकसान
    अमली पदार्थांमुळे तरुणांचे जीवन वाया जात आहे. त्यांच्या कुटुंबावर ही त्याचा परिणाम होत आहे. अशा पदार्थांना रोखण्याची आपली जबाबदारी आहे.
    सर्व विभागांनी सतर्क राहून अमली पदार्थांच्या वाहतूक, विक्री व सेवनावर आळा घालण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.

Web Title: Use technology to track drug sales; Instructions to Thane District Collector Officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.