ग्रामपंचायत निवडणूक जिंकण्यासाठी जादूटोण्याचा वापर ? भिवंडीतील भिनारमधील प्रकार उघड

By nandurbarhyperlocal | Published: January 16, 2021 06:49 PM2021-01-16T18:49:29+5:302021-01-16T18:51:46+5:30

Gram Panchayat Election News : निवडणूक शांततेत पार पडल्या असल्यातरी प्रतिस्पर्ध्या उमेदवाराला हरविण्यासाठी चक्क जादूटोणा केल्याचा धक्कादायक प्रकार भिवंडीतील गोरसई ग्राम पंचायत मध्ये समोर आला

Using witchcraft to win elections? Types of Bhinar Gram Panchayat elections in Bhiwandi revealed | ग्रामपंचायत निवडणूक जिंकण्यासाठी जादूटोण्याचा वापर ? भिवंडीतील भिनारमधील प्रकार उघड

ग्रामपंचायत निवडणूक जिंकण्यासाठी जादूटोण्याचा वापर ? भिवंडीतील भिनारमधील प्रकार उघड

Next

- नितिन पंडीत
भिवंडी - तालुक्यातील ५३ ग्राम पंचायतींसाठी शुक्रवारी मतदान पार पडले . एक दोन ठिकाणच्या घटना वगळता या निवडणूक शांततेत पार पडल्या असल्यातरी प्रतिस्पर्ध्या उमेदवाराला हरविण्यासाठी चक्क जादूटोणा केल्याचा धक्कादायक प्रकार भिवंडीतील गोरसई ग्राम पंचायत मध्ये समोर आला आहे. मात्र या अशा जादूटोण्याला गाववाले घाबरणार नाहीत असे सुज्ञ नागरिकांचे म्हणणे आहे .

एकीकडे राज्यात जादूटोणा प्रतिबंध कायद्यानुसार अंधश्रद्धा निर्मूलनासाठी राज्यशासन प्रयत्नशील असून दुसरीकडे निवडणुकांमध्ये प्रतिस्पर्धी उमेदवारांना हरवीण्यासाठी चक्क जादूटोणा होत असल्याची घटना भिवंडीतील भिणार गावात समोर आली आहे . भिनार गावात ग्राम पंचायत निवडणुकीत वार्ड क्रमांक एक मधून शिवसेना व वंचित बहुजन आघाडी पुरस्कृत जय बजरंग पॅनल भीमराव कांबळे , करून भोईर ,व लक्ष्मी भोईर असे तीन उमेदवार निवडणूक रिंगणात होते . मात्र या उमेदवारांना हरविण्यासाठी त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांनी चक्क त्यांच्या प्रचार पत्रकात अर्धा लिंबू कापून , हळद कुंकू व तांदूळ असा उतारा करून गावातील तलावाच्या बाजूला असलेल्या बोरीच्या झाडाखाली फेकून दिला होता. शनिवारी गावातील एक व्यक्ती बोरं खाण्यासाठी या झाडाजवळ गेला असता सदर प्रकार त्याला दिसल्याने त्यांनी गावातील नागरिकांना सांगितला . त्यानंतर तिन्ही उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी या ठिकाणि धाव घेत एकच गर्दी केली .


दरम्यान मांत्रिकांच्या साहाय्याने सदरचा करणी व जादूटोण्याचा हा प्रकार अतिशय निनादानीय असून या घटनेचा आम्ही तीव्र निषेध नोंदवत असून प्रतिस्पर्ध्या अशा प्रकारे निवडणूक जिंकण्यासाठी खालच्या पातळीवर जातील अशी आम्हला अपेक्षा नव्हती अशी प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे . तर अशा प्रकारच्या जादूटोण्याने निवडणूक जिंकता येत नसून गावात विकास कामे करूनच निवडणूक जिंकता येतात हे विरोधकांना माहित नसेल म्हणूनच त्यांनी असा घृणास्पद प्रकार केला आहे या बाबत आम्ही पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी योग्य तपास करावा अशी प्रतिक्रिया येथील काही नागरिकांनी दिली आहे.

Web Title: Using witchcraft to win elections? Types of Bhinar Gram Panchayat elections in Bhiwandi revealed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.