ठाणे रेल्वेस्थानकात नेहमीचीच वर्दळ, तिकीट खिडकीवर प्रवाशांची गर्दी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 11:59 PM2021-04-15T23:59:53+5:302021-04-16T00:00:10+5:30

Thane railway station : राज्यात कठोर निर्बंध लागू झाल्यानंतरही लोकलमधील गर्दीत फारसा फरक दिसला नाही. ठाणे रेल्वेस्थानकात प्रवेशासाठी काेणतेही निर्बंध नव्हते. आधीच्या लॉकडाऊनप्रमाणे स्थानकाच्या प्रवेशद्वारावर बॅरिकेड‌्स लावलेले दिसले नाहीत.

The usual hustle and bustle at Thane railway station, the crowd of passengers at the ticket window | ठाणे रेल्वेस्थानकात नेहमीचीच वर्दळ, तिकीट खिडकीवर प्रवाशांची गर्दी  

ठाणे रेल्वेस्थानकात नेहमीचीच वर्दळ, तिकीट खिडकीवर प्रवाशांची गर्दी  

Next

ठाणे : राज्य शासनाने गुरुवारपासून पुढील १५ दिवस संचारबंदी लागू केली आहे. मात्र, या संचारबंदीतून रेल्वे सेवा काही अंतर दूर असल्याचे दिसून आले़ ठाणे रेल्वेस्थानकात नेहमीप्रमाणे तिकीट खिडकीवर गर्दी दिसून आली. अत्यावश्यक सेवेतील नाही, तर सर्वांनाच तिकीट दिले जात होते. तसेच रेल्वेत नेहमीसारखी गर्दी दिसत होती.
राज्यात कठोर निर्बंध लागू झाल्यानंतरही लोकलमधील गर्दीत फारसा फरक दिसला नाही. ठाणे रेल्वेस्थानकात प्रवेशासाठी काेणतेही निर्बंध नव्हते. आधीच्या लॉकडाऊनप्रमाणे स्थानकाच्या प्रवेशद्वारावर बॅरिकेड‌्स लावलेले दिसले नाहीत. तिकीट खिडक्यांवरही सर्वांना तिकिटे दिली जात हाेती़ तसेच आरपीएफ आणि जीआयपीही प्रवाशांचे आयकार्ड किंवा क्यूआर कोड तपासत नव्हते. राज्य सरकारकडून रेल्वेस्थानकात काेणाला प्रवेश द्यायचा किंवा द्यायचा नाही याबाबतचे लेखी आदेश अद्याप रेल्वेला दिलेले नाहीत.

‘आदेशच नाही’ 
रेल्वेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या दाेन दिवसांत गर्दीचे निरीक्षण करून मगच लोकलच्या फेऱ्या कमी करायच्या की नाही, याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. निर्बंध लावताना रेल्वेच्या अधिकाऱ्यांना बैठकीलाही बोलावले नव्हते, असे समजते.

Web Title: The usual hustle and bustle at Thane railway station, the crowd of passengers at the ticket window

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे