उटणं , अभ्यंग तेलाचे बाजारात आगमन

By Admin | Published: November 2, 2015 01:30 AM2015-11-02T01:30:43+5:302015-11-02T01:30:43+5:30

दिवाळीनिमित्त लागणाऱ्या उटणे, साबण व अभ्यंगस्नासाठीच्या तेलाचे बाजारात आगमन झाले आहे. उटण्याची किंमत मागील वर्षीच्या तुलनेत १० रुपयांनी वधारली असून त्यामध्ये वापरण्यात

Utah, arrive at the market for ablaze oil | उटणं , अभ्यंग तेलाचे बाजारात आगमन

उटणं , अभ्यंग तेलाचे बाजारात आगमन

googlenewsNext

भाग्यश्री प्रधान, ठाणे
दिवाळीनिमित्त लागणाऱ्या उटणे, साबण व अभ्यंगस्नासाठीच्या तेलाचे बाजारात आगमन झाले आहे. उटण्याची किंमत मागील वर्षीच्या तुलनेत १० रुपयांनी वधारली असून त्यामध्ये वापरण्यात येणारे साहित्य महागल्याचे विक्रेत्यांनी संगितले. त्याचप्रमाणे आयुर्वेदिक अभ्यंग तेल तसेच सुवासिक साबणांनाही बाजारात मागणी वाढली आहे.
उटणे बनवतांना नागरमोथा, संत्रा साल,गव्हला कचली, बावचा, वाळा, मुलतानी माती, गुलाब, आंबे हळद, मंजिष्ठा,अनंत मूळ, तुळस आदी आयुर्वेदिक वनस्पतीची भुकटी केली जाते. त्यानंतर या सर्व भुकट्या एकत्र केल्या जातात. तसेच स्नानगंधा या सुगंधी तेलाला बाजारात जास्त मागणी आहे. या तेलाची १०० मिलीलीटरची बाटली १६० रुपयाला मिळत आहे. ते बनवितांना मंजिष्ठा, रक्तचंदन, कटुका, दारूहरिद्रा, यष्टीमध, कोष्टा, देवधारा, नागरकोरा अगुरू, मुरवा,रसना, व सैंधव तेलाचा वापर केल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. तेलामध्ये वापरलेल्या या सर्वच पदार्थांचा उपयोग त्वचेसाठी उत्तम तेलाची किंमतही गेल्यावर्षीच्या तुलनेत २० रुपयाने वधारली आहे. याचबरोबर चंदनाच्या साबणांनाही मागणी आहे. यातील काही साबण म्हैसूर येथून आणले असून ते शुद्ध चंदनापासूनच बनवल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. ते बाजारात १५० रुपयाला मिळत आहेत. या साबणांमध्येही अनेक प्रकार व्रिक्रीसाठी आले असून चंदन तसेच व्हेजिटेबल आॅईल, कोरफडाचा गर, लिंबाची पाने वापरूनही ते तयार केले आहेत. ते ४० रुपयांपासून बाजारात उपलब्ध आहेत.

Web Title: Utah, arrive at the market for ablaze oil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.