ज्ञानसाधनाचा युटोपीआ कार्यक्रम यंदा ऑनलाईन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 04:30 AM2021-02-19T04:30:36+5:302021-02-19T04:30:36+5:30
ठाणे : सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या वरिष्ठ महाविद्यालयाचा युटोपीआ हा सांस्कृतिक कार्यक्रम यंदा ऑनलाईन स्वरुपात साजरा होत आहे. यात ...
ठाणे : सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या वरिष्ठ महाविद्यालयाचा युटोपीआ हा सांस्कृतिक कार्यक्रम यंदा ऑनलाईन स्वरुपात साजरा होत आहे. यात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या विविध स्पर्धा रंगत असून अनेक मान्यवर उपस्थित राहत आहेत.
फेसपेंटिंग, मेहंदी, नेल आर्ट, नृत्य, गायन, रांगोळी, एगशेल पेंटिंग, कोविड १९ मास्क पेंटिंग अशा विविध स्पर्धांना विद्यार्थ्यांचा भरभरून प्रतिसाद लाभत आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभात ‘चला हवा येऊ द्या’फेम अभिनेत्री श्रेया बुगडे या आवर्जून उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते युटोपीआ महोत्सवाचे ऑनलाईन उद्घाटन झाले.
याचबरोबर २० फेब्रुवारी ते २४ फेब्रुवारी दरम्यान आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांचे आयोजन केले गेले असून यात फोटोग्राफी, शॉर्ट फिल्म अशा विविध स्पर्धांची रेलचेल असणार आहे. या स्पर्धांची रजिस्ट्रेशन लिंक २० फेब्रुवारीपर्यंत खुली असेल. २५ फेब्रुवारी रोजी पारितोषिक वितरण समारंभ होईल. सांस्कृतिक विभागाच्या प्रा. अंजली देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली तंत्रज्ञानाच्या साथीने यंदाही सर्व विद्यार्थी आणि प्राध्यापक महोत्सवात रंग भरत आहेत. महाविद्यालयाचे हे ४० वे वर्ष असून त्यानिमित्ताने संस्थेच्या विश्वस्त मानसी प्रधान यांच्या संकल्पनेतून अनेकविध क्षेत्रातील ४० वेबिनार आयोजित केले जात आहेत. यातील ३० वेबिनार झाले असून महाविद्यालयाच्या फेसबुक पेज तसेच यु ट्यूबच्या माध्यमातून ते अनेकांपर्यंत पोहोचले आहेत.