उत्तन - पाली येथील वाहतुक कोंडी व रस्त्यावरील अतिक्रमणा विरोधात स्थानिक सामाजिक कार्यकर्ते आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2020 08:03 PM2020-01-08T20:03:47+5:302020-01-08T20:04:40+5:30

बसस्थानकावर रिक्षा उब्या केल्या जात असल्याने बस भर रस्त्यात उभी करावी लागतेय.

Uttan - Local social workers aggressive against traffic congestion and road encroachment in Pali | उत्तन - पाली येथील वाहतुक कोंडी व रस्त्यावरील अतिक्रमणा विरोधात स्थानिक सामाजिक कार्यकर्ते आक्रमक

उत्तन - पाली येथील वाहतुक कोंडी व रस्त्यावरील अतिक्रमणा विरोधात स्थानिक सामाजिक कार्यकर्ते आक्रमक

Next

मीरारोड - उत्तन नाका पासुन पाली पर्यंतचा रस्ता अतिक्रमण व बेकायदा पार्किंगच्या विळख्यात सापडला असुन यामुळे प्रचंड वाहतुक कोंडी होत असल्याने परिसरातील चर्च समिती मधील सामाजिक कार्यकर्त्यांनी आक्रमक पावित्रा घेतला आहे. त्यांच्या तक्रारी वरुन आज पोलीस, महापालिका व नगरसेवकांनी संयुक्त पाहणी करुन तातडीने कारवाईची ग्वाही दिली आहे.

भाईंदरच्या उत्तन नाका पर्यंतचा रस्ता नुकताच जुनी दुकाने - घरं तोडुन रुंद करण्यात आला. परंतु या रुंदिकरणा नंतर देखील येथे बेकरी वाल्याची लाकडं तर अन्य लोकांचे सामान भर रस्त्यातच ठेवले जात आहे. शिवाय रस्त्या लगत बेकायदा पार्किंग केली जात आहे. उत्तन नाका येथे तर महापालिकेच्या बस स्थानकालाच रिक्षा चालकांनी विळखा घातला आहे. बसस्थानकावर रिक्षा उब्या केल्या जात असल्याने बस भर रस्त्यात उभी करावी लागतेय. शिवाय नाक्यावर असणाराया टराया, हातगाड्या व दुचाकी , रिक्षा आदिंची मनमानी पार्किंग मुळे मोठी वाहतुक कोंडी होते.

उत्तन नाका पासुन मार्केट पर्यंत देखील वाढिव बांधकामे, पत्राशेड, टपरायांचे अतिक्रमण मोठे आहे. शिवाय दुचाकी, रिक्षा व अवजड मोठया वाहनांची पार्किंग बेकायदा होऊन रहदारी व वाहतुकीला अडथळा होत आहे. येथील पालिकेची मंडई असुन सुध्दा बाहेरच्या बाजुला मोठ्या प्रमाणात हातगाड्या, भाजी - फळवाल्यांच्या गाड्यांचे अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे येथे सुध्दा नेहमीच कोंडी होते. पुढे करईपाडा पर्यंत देखील बेकायदा दुकाने खाडित भराव करुन बांधली असुन तेथे देखील रस्त्याच्या दुतर्फा लहान मोठी वाहने रस्ता अडवुन उभी केली जातात.

सततच्या बेशिस्त व बेकायदा पार्किग तसेच अतिक्रमण व हातगाड्या आदिं मुळे वाहतुक कोंडी कायमची झालेली आहे. शाळकरी मुलं, महिला, नागिरकांना चालण्यासाठी येथे पदपथ व रस्ताच उरत नाही. वाहतुक कोंडीत अडकुन पडल्याने शाळेत वा कामाला जायला नेहमीच उशीर होतो. रुग्णवाहिका, अग्नीशमन दलाचे वाहन सुध्दा यायला - जायला अडथळा होतो. यामुळे ध्वनी आणि वायु प्रदुषण प्रचंड वाढले आहे असा संताप येथील नागरिकां मध्ये आहे.

परंतु कार्यवाही होत नसल्याने चर्च समिती मधील सामाजिक शाखेच्या ल्युसी परेरा, पिंकी मिरांडा, अस्टेलिनिया तान्या, विल्यम सांबराया, जॅरोम रॉड्रिक्स, गोरेटी डोंगरकर, कॅरल मुनिस, वेलेन्सीया मारवी, सिंड्रेला मुनिस, वेलेन्सीया मेंडोन्सा, राल्फ डिसोझा, आॅलिंडा बांड्या, जॉविटा तान्या, वंदना नून, शर्मिला मुनिस आदिंनी या गंभीर बनत चाललेल्या समस्ये विरोधात आक्रमक पावित्रा घेतला. या प्रकरणी त्यांनी निवेदन तयार करुन ठोस कारवाईची मागणी केली.

सामाजिक शाखेच्या कार्यकर्त्यांच्या तक्रारी वरुन आज बुधवारी ठाणे ग्रामीण पोलीस वाहतुक शाखेचे वरिष्ठ निरीक्षक अनिल पवार, उत्तन सागरी पोलीस ठाण्याचे प्रभारी सतिश निकम, प्रभाग अधिकारी सुनिल यादव सह सभापती विनोद म्हात्रे, स्थानिक नगरसेवक हेलन गोविंद, शर्मिला बगाजी व एलायस बांड्या आदिंनी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी अनेक नागरिकांनी देखील वाहतुक कोंडी बद्दल आपले अनुभव सांगत कठोर कारवाईची मागणी केली.

या प्रकरणी महापालिका आणि पोलीसांनी बेकायदा पार्किंग, अतिक्रमण, हातगाड्या, वाढिव बांधकामे तसेच रिक्षा व अवजड वाहनांवर सातत्याने कारवाईचे आश्वासन दिले. या ठिकाणी नो पार्किंगचे फलक लावण्यासह वाहतुक पोलीस तसेच ट्रॅफिक वॉर्डन ची नियुक्ती आणि उत्तन पोलीसां कडुन सततची कारवाई करण्याची ग्वाही दिली गेली.

Web Title: Uttan - Local social workers aggressive against traffic congestion and road encroachment in Pali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.