खूनाच्या गुन्हयात आठ वर्षांपासून फरार आरोपीला उत्तरप्रदेशातून अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 12:02 AM2021-01-02T00:02:50+5:302021-01-02T00:04:51+5:30
कोपरी येथील कदम्बूल उर्फ ताजामुल उर्फ ताजाम्युल शेख (२२) याचा सुऱ्याने गळा कापून खून करुन पसार झालेला त्याचाच मित्र इनामूल हक याला उत्तरप्रदेशातील गोरखपूर येथून ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने १ जानेवारी रोजी अटक केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: कोपरी येथील कदम्बूल उर्फ ताजामुल उर्फ ताजाम्युल शेख (२२) याचा अज्ञात कारणाने सुºयाने गळा कापून खून करुन पसार झालेला त्याचाच मित्र इनामूल हक याला उत्तरप्रदेशातील गोरखपूर येथून ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने १ जानेवारी रोजी अटक केली. त्याला ट्रान्सिस्ट रिमांडद्वारे ठाणे येथे आणले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कदम्बूल याचा १० सप्टेंबर २०१२ रोजी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास कोपरी येथे त्याचाच मित्र इनामूल याने सुºयाने गळा कापून खून केला होता. याप्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी केलेल्या तपासात शेख याचा मित्र इनामूल यानेच तो खून केल्याचे समोर आले होते. या खूनानंतर मुळचा पश्चिम बंगाल येथे राहणारा शेख भूमीगत झाला होता.
दरम्यान, खूनासारख्या गंभीर गुन्हयात पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्याचे आदेश पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी गुन्हे अन्वेषण विभागाला दिले होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट एकचे पथक या खूनाचा गेल्या दोन वर्षांपासून तपास करीत होते. तो गोरखपूर उत्तरप्रदेश येथे असल्याची माहिती मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे या पथकाने चार वेळा गोरखपूर गाठले. मात्र, आरोपीने या पथकाला हुलकावणी दिली. उत्तरप्रदेश आणि नेपाळ येथे स्थानिक बातमीदार तयार करु न त्यांना आरोपीबाबत माहिती देवून त्याचा सुगावा लागल्यास संपर्क साधण्याबाबत सांगण्यात आले होते. दरम्यान, तो नेपाळ येथून गोरखपूर येथे येणार असल्याची माहिती या पथकाला मिळाली. त्याच माहितीच्या आधारे उत्तरप्रदेश येथील एसटीएफच्या मदतीने सहायक पोलीस निरीक्षक गिरी आणि योगेश काकड यांच्या पथकाने अखेर १ जानेवारी २०२१ रोजी गोरखपूर येथून त्याला ताब्यात घेतले. चौकशीमध्ये त्याने या खूनाची कबूली पोलिसांना दिली. गोरखपूर येथील स्थानिक यायालयातून त्याला ट्रान्स्टिस्ट रिमांड घेऊन ठाण्यात आणले जाणार आहे.