डोंबिवली, ठाकुर्ली, कोपरस्थानकात रात्रभरात ३५ कुत्र्यांना लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:42 AM2021-05-07T04:42:22+5:302021-05-07T04:42:22+5:30

डोंबिवली : शहरात भटक्‍या कुत्र्यांची संख्या वाढत असून त्यांना रेबीजची लागण होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे बुधवारी कोपर, डोंबिवली, ठाकुर्ली ...

Vaccinate 35 dogs overnight at Dombivali, Thakurli, corner station | डोंबिवली, ठाकुर्ली, कोपरस्थानकात रात्रभरात ३५ कुत्र्यांना लस

डोंबिवली, ठाकुर्ली, कोपरस्थानकात रात्रभरात ३५ कुत्र्यांना लस

Next

डोंबिवली : शहरात भटक्‍या कुत्र्यांची संख्या वाढत असून त्यांना रेबीजची लागण होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे बुधवारी कोपर, डोंबिवली, ठाकुर्ली रेल्वेस्थानकामधील सुमारे ३५ भटक्या श्वानांना रेबीज प्रतिबंधक लस टोचण्यात आली. प्लांट अँड ऍनिमल वेल्फेअर असोसिएशन (पॉज) दरवर्षी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून रेबीज लसीकरण मोहीम घेते.

पुढील टप्प्यामध्ये कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, दिवा, मुंब्रा कळवा आणि ठाणे येथेही ही मोहीम राबवण्यात येईल, असे राज मारू यांनी सांगितले.

रेल्वेस्थानक परिसरातील भटक्‍या कुत्र्यांचे प्रमाण वाढले आहे. यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पॉजतर्फे यांचे लसीकरण येत्या आठवड्यात केले जाणार आहे. दरम्यान, कोपर, ठाकुर्ली आणि डोंबिवली रेल्वेस्थानक परिसरातील भटक्‍या कुत्र्यांचे लसीकरण केल्याची माहिती संस्थेचे संस्थापक नीलेश भणगे यांनी दिली.

ठाणे शहरासह उपनगरात भटक्‍या कुत्र्यांचे प्रमाण वाढले आहे. रेबीज झालेला कुत्रा माणसाला चावल्यास त्याचा मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे शहरी कुत्र्यांना अँटी रेबीज लस देण्याचा उपक्रम पॉजने मागील वीस वर्षांपासून सुरू केला. विविध महापालिकांकडून कुत्र्यांचे निर्बीजीकरण केले जाते. त्याचवेळी त्यांचे लसीकरण करण्यात येते. मात्र, भटक्‍या कुत्र्यांचे लसीकरणच होत नसल्याने त्यांच्यासह परिसरातील सर्वसामान्यांच्या जिवालाही धोका निर्माण होतो. त्यामुळेच ही विशेष रेबीजविरोधी मोहीम हाती घेण्यात येत असल्याचे संस्थेतर्फे सांगण्यात आले.

-----------------

Web Title: Vaccinate 35 dogs overnight at Dombivali, Thakurli, corner station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.