ठाण्यात पोलीस कुटूंबीयांमधील १०९ जणांना कोविडचे लसीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2021 10:09 PM2021-04-16T22:09:14+5:302021-04-16T22:19:49+5:30

ठाणे महानगरपालिका आणि पोलीस मुख्यालयाच्या वतीने ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील पोलीस कुटूंबांमधील १०९ जणांना कोविड-१९ प्रतिबंधात्मक लसीकरण शुक्रवारी करण्यात आले. ठाणे शहर पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानामध्ये हे लसीकरण केंद्र पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या संकल्पनेतून सुरु करण्यात आले आहे.

Vaccination of 109 members of police families in Thane | ठाण्यात पोलीस कुटूंबीयांमधील १०९ जणांना कोविडचे लसीकरण

शहीद पोलीस कुटूंबीयांपैकी ३४ जणांचा समावेश

googlenewsNext
ठळक मुद्दे शहीद पोलीस कुटूंबीयांपैकी ३४ जणांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: ठाणे महानगरपालिका आणि पोलीस मुख्यालयाच्या वतीने ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील पोलीस कुटूंबांमधील १०९ जणांना कोविड-१९ प्रतिबंधात्मक लसीकरण शुक्रवारी करण्यात आले. यामध्ये शहीद पोलीस कुटूंबीयांमधील ३४ जणांचा समावेश होता.
ठाणे शहर पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानामध्ये हे लसीकरण केंद्र पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या संकल्पनेतून सुरु करण्यात आले आहे. ठाणे महापालिकेच्या टेंभी नाका येथील वाडिया रुग्णालयाच्या मदतीने पोलीस कुटूंबीयांना लस उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ४५ वर्षांंपेक्षा अधिक वयोगटातील या कुटूंबीयांसाठी १६ एप्रिलपासून हे लसीकरण सुरु करण्यात आले. शुक्रवारी सकाळी सुरु झालेल्या या लसीकरणाच्या वेळी सह पोलीस आयुक्त डॉ. सुरेश मेकला, अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रविण पवार, मुख्यालय एकचे उपायुक्त दत्तात्रय कांबळे आणि मुख्यालय -२ चे उपायुक्त गणेश गावडे हे यावेळी उपस्थित होते. पोलीस रुग्णालयाच्या डॉक्टर विजया रोकडे, परिचारिका वर्षा मांडवकर आणि रिया अवनेकर यांनी हे लसीकरण केले. शुक्रवारी दिवसभरात १०९ जणांना ही लस देण्यात आली असून यापुढे रोज किमान १०० जणांना लस देण्यात येणार असल्याचे उपायुक्त गावडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

Web Title: Vaccination of 109 members of police families in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.