ठाण्यात सव्वा लाख नागरिकांचे लसीकरण पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:40 AM2021-03-26T04:40:53+5:302021-03-26T04:40:53+5:30

ठाणे : केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ठाणे शहरात व्यापक प्रमाणात लसीकरण मोहीम सुरू असून आतापर्यंत एक लाख ...

Vaccination of 15 lakh citizens completed in Thane | ठाण्यात सव्वा लाख नागरिकांचे लसीकरण पूर्ण

ठाण्यात सव्वा लाख नागरिकांचे लसीकरण पूर्ण

googlenewsNext

ठाणे : केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ठाणे शहरात व्यापक प्रमाणात लसीकरण मोहीम सुरू असून आतापर्यंत एक लाख २४ हजार ८२७ नागरिकांना ठाणे महापालिकेच्या आरोग्य केंद्रांसह खाजगी हॉस्पिटलमध्ये कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी गुरुवारी दिली.

कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी तयार केलेल्या कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन लसींचा डोस शासनाने दिलेल्या मार्गदर्शनानुसार टप्प्याटप्प्याने देण्याचे काम महापालिका प्रशासनाच्या वतीने सुरू आहे. या मोहिमेंतर्गत पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाइन वर्कर्सला दिली. तर, सद्य:स्थितीत ज्येष्ठ नागरिक आणि ४५ वर्षांवरील सहव्याधी असलेल्यांना ती देण्यात येत आहे. आतापर्यंत ठाण्यात एक लाख २४ हजार ८२७ नागरिकांना लस दिली आहे. यामध्ये महापालिका केंद्रांत एक लाख दोन हजार ८८४ तर खाजगी हॉस्पिटलमध्ये २१ हजार ९४३ नागरिकांना लस दिली आहे. ६० वर्षांवरील ५९ हजार ८९२ नागरिकांना, ५५ हजार ११८ आरोग्य आणि फ्रंटलाइन कर्मचारी तसेच ४५ ते ६० वयोगटांतील नऊ हजार ८१७ नागरिकांना लस दिल्याची माहिती शर्मा यांनी दिली.

लसीकरण केंद्रामध्ये महापालिकेच्या ठाणे ग्लोबल इम्पॅक्ट हब, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, पोस्ट कोविड सेंटर, मेंटल हॉस्पिटल, कौसा हॉस्पिटल, हाजुरी, सह्याद्री, आंबेडकर भवन, वाडिया, किसननगर, रोसा गार्डेनिया, कौसा आरोग्य केंद्र, कोपरी मॅटर्निटी, अतकोनेश्वर आरोग्य केंद्र, आयुर्वेदिक हेल्थ सेंटर, आझादनगर आरोग्य केंद्र, बाळकुम आरोग्य केंद्र, सी.आर. वाडिया आरोग्य केंद्र, रोसा गार्डेनिया, गांधीनगर, कळवा, किसननगर, लक्ष्मी चिरागनगर आरोग्य केंद्र, लोकमान्य कोरेस आरोग्य केंद्र, माजिवडा आरोग्य केंद्र, मनोरमानगर, मानपाडा, नौपाडा, शीळ आरोग्य केंद्र, शिवाजीनगर आरोग्य केंद्र, उथळसर आरोग्य केंद्र, वर्तकनगर आरोग्य केंद्र, सावरकरनगर आरोग्य केंद्र आणि आनंदनगर आरोग्य केंद्र, काजूवाडी आरोग्य केंद्र, कौसा, कोरेस, कोपरी आरोग्य केंद्र, आपला दवाखाना आणि ढोकाळी आरोग्य केंद्र आदी ठिकाणांचा समावेश आहे.

खाजगी रुग्णालयांमध्ये सिद्धिविनायक रुग्णालय, सफायर, वेदान्त हॉस्पिटल, ज्युपिटर हॉस्पिटल, काळसेकर रुग्णालय, प्राइम होरायझन हॉस्पिटल, हायवे हॉस्पिटल, पिनॅकल ऑर्थोकेअर हॉस्पिटल, हायलॅण्ड हॉस्पिटल, ईशा नेत्रालय आणि कौशल्या रुग्णालय आदी रुग्णालयांचा समावेश आहे.

Web Title: Vaccination of 15 lakh citizens completed in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.