परदेशात जाणाऱ्या १९५ विद्यार्थ्यांचे ठाण्यात पहिल्याच दिवशी लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:30 AM2021-06-01T04:30:30+5:302021-06-01T04:30:30+5:30

ठाणे : परदेशातील विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी ठाणे महापालिकेच्या वतीने माजीवडा येथील पोस्ट कोविड लसीकरण केंद्रात ‘वॉक ...

Vaccination of 195 students going abroad on the first day in Thane | परदेशात जाणाऱ्या १९५ विद्यार्थ्यांचे ठाण्यात पहिल्याच दिवशी लसीकरण

परदेशात जाणाऱ्या १९५ विद्यार्थ्यांचे ठाण्यात पहिल्याच दिवशी लसीकरण

Next

ठाणे : परदेशातील विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी ठाणे महापालिकेच्या वतीने माजीवडा येथील पोस्ट कोविड लसीकरण केंद्रात ‘वॉक इन’ पद्धतीने सुरू केलेल्या लसीकरण मोहिमेंतर्गत सोमवारी पहिल्याच दिवशी १९५ विद्यार्थ्यांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली. या लसीकरणाला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, मंगळवारीदेखील सकाळी ११.०० ते २.०० या वेळेत लसीकरण सुरू राहणार आहे.

परदेशातील विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षणासाठी ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे, अशा विद्यार्थ्यांची लसीकरणाअभावी शैक्षणिक संधी वाया जाऊ नये यासाठी ठाणे महापालिका क्षेत्रातील विद्यार्थ्यांना माजीवडा येथील पोस्ट कोविड लसीकरण केंद्रात 'वॉक इन' लसीकरण सुविधा महापालिकेने उपलब्ध केली आहे. यामध्ये ठाणे महापालिका क्षेत्रात वास्तव्यास असणाऱ्या विद्यार्थ्यांनाच सदरच्या केंद्रात लस देण्यात येत असून परदेश प्रवेशपत्र, व्हिसा तसेच संबंधित कागदपत्रांची पडताळणी करूनच ती देण्यात येत आहे. परदेशात उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी लसीकरणाचा लाभ घेण्याचे आवाहन ठामपाने केले आहे.

Web Title: Vaccination of 195 students going abroad on the first day in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.