अलका सावली प्रतिष्ठानच्या प्रयत्नाने बेतूरकर पाडा परिसरात लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:37 AM2021-08-01T04:37:13+5:302021-08-01T04:37:13+5:30

कल्याण : अलका सावली प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुधीर वायले यांच्या प्रयत्नाने कल्याण पश्चिमेतील बेतूरकर पाडा परिसरातील कै. ...

Vaccination in Beturkar Pada area through the efforts of Alka Saavi Pratishthan | अलका सावली प्रतिष्ठानच्या प्रयत्नाने बेतूरकर पाडा परिसरात लसीकरण

अलका सावली प्रतिष्ठानच्या प्रयत्नाने बेतूरकर पाडा परिसरात लसीकरण

Next

कल्याण : अलका सावली प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुधीर वायले यांच्या प्रयत्नाने कल्याण पश्चिमेतील बेतूरकर पाडा परिसरातील कै. बापूराव आघारकर शाळेत कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या सहकार्याने लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. शनिवारी लसीकरणाच्या पहिल्याच दिवशी तब्बल ३५० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.

कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असून, शासनानेही काही प्रमाणात निर्बंध शिथिल करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे जास्तीतजास्त नागरिकांचे लसीकरण व्हावे यासाठी कल्याणमधील अलका सावली प्रतिष्ठान प्रयत्नशील आहे. बेतूरकरपाडा परिसरातील नागरिकांना लसीकरणासाठी इतरत्र धाव घ्यावी लागत होती. इतर केंद्रांवर होणाऱ्या गर्दीमुळे नागरिकांचा बराचसा वेळ लसीकरणाच्या रांगेत जात होता.

नागरिकांची ही समस्या लक्षात घेऊन अलका सावली प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुधीर वायले यांनी बेतूरकर पाडा परिसरात लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी पालिका प्रशासनाकडे केली होती. त्यानुसार पालिकेने बेतूरकर पाडा येथील कै. बापूराव आघारकर शाळेत लसीकरण केंद्र सुरू करण्यास मान्यता दिली. आजपासून हे केंद्र सुरू झाले. आगामी काळातही हे लसीकरण केंद्र सुरू राहणार असून, नागरिकांनी लसीकरण करून घेण्याचे आवाहन वायले यांनी केले आहे.

दरम्यान, या लसीकरण केंद्रावर नागरिकांच्या सुविधेसाठी यश महाजन, सागर वाघ, आकाश वायले, बंड्या कराळे, शरद शेलार, अजय पवार, अनिकेत वायले, तुषार देशमुख, सत्यम् पाटील, मितेश बाऊस्कर, वैभव देशमुख, स्वप्निल गुरव आदींसह संस्थेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मेहनत घेत आहेत.

फोटो-कल्याण -लसीकरण

Web Title: Vaccination in Beturkar Pada area through the efforts of Alka Saavi Pratishthan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.