पातलीपाडा येथील लसीकरण केंद्र सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:28 AM2021-06-18T04:28:00+5:302021-06-18T04:28:00+5:30
ठाणे : डोंगरीपाडा, पातलीपाडा या परिसरात राहणाऱ्या नागरिकांसाठी याच परिसरात लसीकरण केंद्र सुरू करावे, अशी मागणी स्थानिक नगरसेवकांसह ...
ठाणे : डोंगरीपाडा, पातलीपाडा या परिसरात राहणाऱ्या नागरिकांसाठी याच परिसरात लसीकरण केंद्र सुरू करावे, अशी मागणी स्थानिक नगरसेवकांसह शिवसेना पदाधिकारी तसेच नागरिकांनी महापौर नरेश म्हस्के यांच्याकडे केली होती. यासाठी पातलीपाडा येथे असलेल्या महापालिकेच्या जागेची पाहणी करून येथे लसीकरण केंद्र सुरू करण्याबाबत महापौरांनी आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्याशी चर्चा केली. त्यानुसार, गुरुवारी पातलीपाडा, हिरानंदानी इस्टेट रोडवरील लसीकरण केंद्राचे उद्घाटन महापौरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी उपमहापौर पल्लवी कदम, स्थायी समिती सभापती संजय भोईर, विरोधी पक्षनेते शानू पठाण, स्थानिक नगरसेविका अर्चना मणेरा, कमल चौधरी, कविता पाटील, नगरसेवक सिद्धार्थ ओवळेकर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. खुशबू टावरी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.
या केंद्रामुळे डोंगरीपाडा, पातलीपाडा, हिरानंदानी इस्टेट तसेच आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना याचा फायदा होणार असल्याने लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांनी महापौरांचे आभार व्यक्त केले. स्थानिकांच्या मागणीनुसार येत्या दोन ते तीन दिवसांत या ठिकाणी ताप, सर्दी, खोकला आदी प्राथमिक आजारांवरदेखील उपचार सुरू करण्यात येणार असल्याचे महापौरांनी यावेळी जाहीर केले.