अंबरनाथमध्ये ३० वर्षांवरील नागरिकांसाठी लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:26 AM2021-06-23T04:26:29+5:302021-06-23T04:26:29+5:30
अंबरनाथ : अंबरनाथमध्ये ३० वर्षांवरील नागरिकांसाठी लसीकरणाला प्रारंभ झाला आहे. अंबरनाथ ऑर्डनन्स हॉस्पिटलमध्ये हे लसीकरण सुरू केले आहे. ३० ...
अंबरनाथ : अंबरनाथमध्ये ३० वर्षांवरील नागरिकांसाठी लसीकरणाला प्रारंभ झाला आहे. अंबरनाथ ऑर्डनन्स हॉस्पिटलमध्ये हे लसीकरण सुरू केले आहे.
३० ते ४४ वयोगटातील नागरिकांना ऑनलाईन नोंदणी न करता थेट टोकन पद्धतीने लसीकरण करण्यात येणार आहे. त्यातच अंबरनाथच्या ऑर्डनन्स हॉस्पिटलमध्ये आतापर्यंत सर्व अंबरनाथकरांसाठी लसीकरणाची मोहीम सुरू होती. मात्र, त्यात ऑर्डनन्स फॅक्टरीच्या कर्मचाऱ्यांनाच लस मिळत नसल्याने काहीशी नाराजी होती. त्यामुळे आता ऑर्डनन्स हॉस्पिटलच्या वतीने ऑर्डनन्स फॅक्टरी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठीही लसीकरणाची विशेष मोहीम सुरू केली आहे. यामध्येही आता ३० वर्षांवरील सर्वांना लस दिली जाते. सकाळी १० ते ३ या वेळेत ऑर्डनन्स हॉस्पिटलमधील लसीकरण केंद्र सुरू राहणार असून, नोंदणी न करता आलेल्यांनाही लस दिली जाणार आहे. दिवसाला जवळपास २५० नागरिकांना याठिकाणी लस दिली जाणार आहे.