दिव्यांग विद्यार्थ्यांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:28 AM2021-06-18T04:28:18+5:302021-06-18T04:28:18+5:30
मुंब् राः येथील कौसा भागातील ‘उम्मीद दी होप’ या विशेष शाळेमध्ये शिकत असलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांना शाळेच्या परिसरात बुधवारी ...
मुंब् राः येथील कौसा भागातील ‘उम्मीद दी होप’ या विशेष शाळेमध्ये शिकत असलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांना शाळेच्या परिसरात बुधवारी कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली. ज्या विद्यार्थ्यांना लस देण्यात आली, ते दिव्यांग असल्यामुळे प्रत्यक्ष लसीकरण केंद्रावर जाऊ शकत नसल्याची अडचण शाळेचे संचालक परवेझ फरीद यांनी परिवहन समितीचे सदस्य शमिम खान यांच्या निदर्शनास आणून दिली होती. यावर खान यांनी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड तसेच पक्षाच्या इतर पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने परिवहन सेवेच्या लसीकरण करणाऱ्या बसची व्यवस्था करून, शाळेच्या परिसरात विद्यार्थ्यांना लस देण्याची व्यवस्था केली.