ठाण्यात १८ वर्षांवरील दिव्यांगांसाठी दर शुक्रवारी लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:28 AM2021-06-18T04:28:01+5:302021-06-18T04:28:01+5:30
ठाणे : ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने १८ वर्षांवरील दिव्यांगांसाठी दर शुक्रवारी सकाळी ११ ते २.०० या वेळेत प्रभाग ...
ठाणे : ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने १८ वर्षांवरील दिव्यांगांसाठी दर शुक्रवारी सकाळी ११ ते २.०० या वेळेत प्रभाग समितीनिहाय विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. याचा दिव्यांग बांधवांनी लाभ घेण्याचे आवाहन महापौर नरेश म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी केले आहे.
शहरातील सर्व दिव्यांग बांधव लसीकरणापासून वंचित राहू नयेत तसेच त्यांना नजीकच्या आरोग्य केंद्रावर लस घेता यावी यासाठी ठाणे महापालिकेच्या वतीने विशेष लसीकरण मोहीम ठामपा राबवीत आहे. यासाठी दिव्यांग बांधवांना सहज ये-जा करता येईल, अशाच प्रभाग समितीनिहाय आरोग्य केंद्राची निवड केली आहे. यामध्ये शीळ आरोग्य केंद्र, छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल, कौसा स्टेडियम, कोरस आरोग्य केंद्र, रोझा गार्डेनिया, आपला दवाखाना आनंदनगर, सीआर वाडिया, श्रीनगर मॅटर्निटी तसेच पार्किंग प्लाझा या लसीकरण केंद्रांवर दर शुक्रवारी सकाळी ११.०० ते २.०० या वेळेत ही विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. दिव्यांगांना त्यांचे अपंग ओळखपत्र दाखवूनच लस घेता येणार आहे. या विशेष मोहिमेकरिता चिकित्सक मानसशास्त्रज्ञ विशेष शिक्षक आधार कुलकर्णी यांची समन्वयक अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. लसीकरणाबाबत काही शंका असल्यास ९१६७२५३१३० या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही महापालिकेने केले आहे.