परदेशात जाणाऱ्या विद्यार्थांसाठी लसीकरणाची सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:29 AM2021-06-02T04:29:58+5:302021-06-02T04:29:58+5:30
कल्याण : केडीएमसी हद्दीतून परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या १८ ते ४५ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र कोविशिल्ड लसीकरणाची सोय २ आणि ...
कल्याण : केडीएमसी हद्दीतून परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या १८ ते ४५ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र कोविशिल्ड लसीकरणाची सोय २ आणि ३ जूनला पश्चिमेतील आर्ट गॅलरी लसीकरण केंद्रावर करण्यात आली आहे. सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत लसीकरण केले जाणार आहे.
लसीकरणासाठी आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट यापैकी एक आवश्यक आहे. वास्तव्याचा पुरावा पत्त्यासह हवा. आय २० फॉर्म, डीएस १६० फाॅर्म आणि परदेशी विद्यापीठाचे शिक्षण संस्थेचे पत्र यापैकी एक सादर करावे लागेल. कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती आणि मूळ कागदपत्रे पडताळणीसाठी लसीकरण केंद्रावर घेऊन यावीत. झेरॉक्स प्रती लसीकरण केंद्रावर जमा करून घेतल्या जातील. या लसीकरण सुविधेचा परदेशी शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. दरम्यान, लसीअभावी अन्य नागरिकांचे सर्व केंद्रांवरील लसीकरण उद्या बंद राहणार आहे.
-------------------