तीन दिवसांत चार हजार ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:40 AM2021-03-05T04:40:57+5:302021-03-05T04:40:57+5:30

तीन दिवसांत ४ हजार नागरिकांचे लसीकरण लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ठाणे महापालिका हद्दीत ...

Vaccination of four thousand senior citizens in three days | तीन दिवसांत चार हजार ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण

तीन दिवसांत चार हजार ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण

Next

तीन दिवसांत ४ हजार नागरिकांचे लसीकरण

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ठाणे महापालिका हद्दीत तीन दिवसांत एकूण ४ हजारहून अधिक नागरिकांचे लसीकरण झाले. यात ६० वर्षांवरील एकूण ३,५९९ ज्येष्ठ नागरिकांचा तर ४५ ते ६० वयोगटातील ६१५ नागरिकांचा समावेश आहे. ज्येष्ठ नागरिकांचा प्रतिसाद हा प्रेरणादायी असल्याबाबत महापौर नरेश म्हस्के यांनी ज्येष्ठ नागरिकांचे अभिनंदन करून जास्तीतजास्त नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन केले.

महापौर म्हस्के यांनी हाजुरी आरोग्य केंद्र, काजूवाडी आरोग्य केंद्र व मेंटल हॉस्प‍िटल येथील आरोग्य केंद्राला गुरुवारी भेट दिली. या वेळी आरोग्य परिरक्षण व वैद्यकीय साहाय्य समितीच्या सभापती निशा पाटील, नौपाडा कोपरी प्रभाग समिती अध्यक्षा नम्रता फाटक, नगरसेवक विकास रेपाळे, नगरसेविका मीनल संख्ये, माजी नगरसेविका नम्रता भोसले-जाधव उपस्थित होत्या.

ज्येष्ठ नागरिकांना जास्त वेळ रांगेत उभे राहू लागू नये तसेच गर्दी होऊ नये यासाठी लसीकरणाची केंद्रे वाढविण्याचे आदेश महापौरांनी प्रशासनाला दिले होते, त्यानुसार नवीन लसीकरण केंद्रे ‍महापालिका क्षेत्रात विविध ठिकाणी सुरू केली. त्याचा आढावा महापौरांनी घेतला. ठाण्यात आजमितीला २५ लसीकरण केंद्रे सुरू आहेत. या सर्व लसीकरण केंद्रांवर ज्येष्ठ नागरिकांसाठी खुर्च्यांची व पाण्याची सोय करण्यात यावी; तसेच काही आरोग्य केंद्रांवर त्रुटी असल्यास त्याही दूर कराव्यात, असे आदेश महापौरांनी दिले.

ज्येष्ठ नागरिकांना काही आजार असल्यास त्यांनी आपल्या फॅमिली डॉक्टरांचे प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे आहे.

कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या पहिल्या टप्प्यात फ्रंटलाइनवर काम करणारे आरोग्य कर्मचारी, शासकीय कर्मचारी अशा एकूण २९ हजार १२४ कर्मचाऱ्यांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. आतापर्यंत ६,६७० आरोग्य कर्मचाऱ्यांचा कोरोना लसीचा दुसरा डोसही पूर्ण झाला आहे.

............

खाजगी रुग्णालयांमधील लसीकरण रेंगाळले

लसीकरणासाठी नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी सिद्धिविनायक हास्प‍िटल, वेदांत हॉस्प‍िटल, वर्तकनगर, ज्युपिटर हॉस्प‍िटल - ठाणे, प्राईम होरायजन पातलीपाडा, हायवे हॉस्प‍िटल - लुईसवाडी, पिनॅकल आर्थोकेअर हॉस्प‍िटल - चंदनवाडी, हायलॅण्ड हॉस्प‍िटल - ढोकाळी, कौशल्य हॉस्प‍िटल - पाचपाखाडी, काळसेकर हॉस्प‍िटल - मुंब्रा येथे लसीकरण केंद्र सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, अजून तेथे लसीकरण सुरू झालेले नाही. येत्या दोन दिवसांत या ठिकाणी लसीकरणास सुरुवात होणार असल्याचे गेले चार दिवस सांगितले जात आहे.

..........

वाचली.

Web Title: Vaccination of four thousand senior citizens in three days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.