परदेशी शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 06:12 PM2021-06-01T18:12:49+5:302021-06-01T18:13:02+5:30

महापालिकेने भाईंदर पश्चिमच्या नगरभवन येथे मंगळवार पासून केवळ १८ वर्षां वरील परदेशात शिकण्यास जाणाऱ्या  विद्यार्थ्यांसाठी लसीकरण केंद्र सुरू केले आहे. 

Vaccination of students going for foreign education | परदेशी शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना लस

परदेशी शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना लस

Next

मीरारोड - मुंबई व ठाणे महापालिके प्रमाणेच आता मीरा भाईंदर महानगरपालिकेने परदेशात शिक्षणा साठी जाणाऱ्या १८ वर्षां वरील विद्यार्थ्यांना मंगळवार पासून मोफत लस देण्यास सुरुवात केली आहे. 

महापालिकेने भाईंदर पश्चिमच्या नगरभवन येथे मंगळवार पासून केवळ १८ वर्षां वरील परदेशात शिकण्यास जाणाऱ्या  विद्यार्थ्यांसाठी लसीकरण केंद्र सुरू केले आहे.  दुपारी १२ ते ४ ह्या वेळात लस दिली जाईल . मुंबई व ठाणे महापालिकेने प्रदेशात शिकण्यासाठी जाणाऱ्या १८ वर्षा वरील विद्यार्थ्यांना मोफत लस देण्याची सुविधा दिली आहे. त्या अनुषंगाने मीरा भाईंदरमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा परदेशात शिक्षणा साठी जाण्या आधी पालिकेने मोफत लसीकरणची सुविधा देण्याची मागणी महापौर ,आयुक्तांकडे केल्याचे नगरसेविका हेतल परमार म्हणाल्या . आयुक्त दिलीप ढोले यांनी सुद्धा याची त्वरित दखल घेऊन विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र लसीकरण केंद्र सुरु केल्याने दिलासा मिळाला आहे असे परमार म्हणाल्या . 

Web Title: Vaccination of students going for foreign education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.