‘व्हॅक्सिनेशन ऑन व्हील’ थेट ठाणे सत्र न्यायालयात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:25 AM2021-06-30T04:25:46+5:302021-06-30T04:25:46+5:30
ठाणे जिल्हा बार कौन्सिलने मानले पालकमंत्री एकनाथ शिंदे व महापौर नरेश म्हस्के यांचे आभार लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे ...
ठाणे जिल्हा बार कौन्सिलने मानले पालकमंत्री एकनाथ शिंदे व महापौर नरेश म्हस्के यांचे आभार
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : वकील हा सुद्धा समाजातील महत्त्वाचा घटक असून, नागरिकांना न्याय मिळवून देण्याचे कार्य ते अविरत करीत असतात. कोविडच्या काळातही वकिलांचे काम सुरू होते, अनेक लोकांशी त्यांचा संपर्क येत असल्यामुळे मंगळवारी ठाणे सत्र न्यायालयात ‘व्हॅक्सिनेशन ऑन व्हील’ या ठाणे महानगरपालिकेच्या उपक्रमांतर्गत जिल्हा बार कौन्सिल यांच्या सहकार्याने लसीकरण शिबिराचे आयोजन केले होते. या मोहिमेस पालकमंत्री एकनाथ शिंदे व महापौर नरेश म्हस्के यांनी भेट देऊन वकिलांशी संवाद साधून त्यांची विचारपूस केली. तसेच थेट न्यायालयातच लस उपलब्ध केल्याबद्दल वकिलांनी देखील त्यांचे आभार मानले.
यावेळी नगरसेवक सुधीर कोकाटे, ठाणे जिल्हा बार कौन्सिलचे अध्यक्ष प्रशांत कदम, सदस्य ॲड. गजानन चव्हाण, प्रमुख जिल्हा न्यायाधीश रवींद्र जोशी, न्यायाधीश ब्रह्मे, भक्त, तांबे तसेच वकील, न्यायालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यापूर्वी देखील ठाणे महानगरपालिकेने टेंभीनाका येथील वाडिया दवाखान्यात वकिलांसाठी तीन वेळा लसीकरणाचे आयोजन करण्यात आले होते.