ठाण्यात आजही लसीकरण राहणार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:42 AM2021-05-18T04:42:04+5:302021-05-18T04:42:04+5:30

ठाणे : तौक्ते चक्रीवादळामुळे वाहणारे वारे आणि जोरदार पावसाची शक्यता लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून ठाण्यातील कोरोना प्रतिबंधक लसीकरण ...

Vaccination will remain closed in Thane even today | ठाण्यात आजही लसीकरण राहणार बंद

ठाण्यात आजही लसीकरण राहणार बंद

googlenewsNext

ठाणे : तौक्ते चक्रीवादळामुळे वाहणारे वारे आणि जोरदार पावसाची शक्यता लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून ठाण्यातील कोरोना प्रतिबंधक लसीकरण सोमवारी बंद ठेवण्यात आले होते. परंतु, आता मंगळवारीदेखील हा धोका लक्षात घेऊन लसीकरण पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन महापौर नरेश म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले आहे.

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती. त्यानुसार शहरात रविवारी रात्रीपासून अतिवृष्टी सुरू आहे. तसेच वेगाने वारे व पर्जन्यवृष्टीची शक्यता लक्षात घेता लसीकरणासाठी घराबाहेर पडून नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी सर्व लसीकरण केंद्र बंद करण्याचा निर्णय शर्मा यांनी घेतला आहे. पर्जन्यवृष्टीच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर वीजप्रवाह खंडित होण्याची शक्यता, धोकादायक इमारती, रस्त्यावर पाणी येणे, वृक्ष पडून वाहतुकीस अडथळा, तसेच इतर संभाव्य धोक्याचा विचार करता लसीकरणात व्यत्यय येऊ नये, यासाठी मंगळवारी लसीकरण पूर्णत: बंद करण्यात येणार आहे. नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे मनपाने केले आहे.

------------------

Web Title: Vaccination will remain closed in Thane even today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.