महिन्यातील एक दिवस महिलांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:43 AM2021-08-22T04:43:04+5:302021-08-22T04:43:04+5:30
ठाणे : लसीकरणाचा तुटवडा लक्षात घेऊन ठाणो महापालिकेने यापुढे केवळ ठाणेकरांचा लस देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर ...
ठाणे : लसीकरणाचा तुटवडा लक्षात घेऊन ठाणो महापालिकेने यापुढे केवळ ठाणेकरांचा लस देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता महिलांचे ही जास्तीत जास्त लसीकरण व्हावे यासाठी प्रत्येक महिन्याच्या चौथ्या आठवड्यातील एक दिवस खास महिलांसाठी लसीकरण मोहीम ठेवण्यात येणार असून त्याची सुरुवात येत्या सोमवारपासून करणार असल्याची माहिती महापौर नरेश म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिली.
प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लसींच्या उपलब्धतेनुसार एक दिवस पार्किंग प्लाझा येथे हे लसीकरण शिबिर ठेवले जाणार आहे. ठाणे शहरात आतापर्यंत नऊ लाख लसीकरण पूर्ण झाले आहे. त्यात चार लाख ७७ हजार ५५० पुरुष तर ४ लाख २३ हजार ४८८ महिलांचे (यात गर्भवती महिला १६० तर अंथरुणाला खिळलेल्या ५ महिलांचा समावेश आहे). लसीकरण झाले आहे.