वसई किल्ल्यात विहीर सफाई मोहिम

By admin | Published: May 22, 2017 01:43 AM2017-05-22T01:43:30+5:302017-05-22T01:43:30+5:30

वसई किल्ल्यात असलेली अष्टकोनी विहीर स्वच्छ करण्याची मोहिम टिम आमची वसईने हाती घेतली असून ती पावसाळ््यापूर्वी पूर्णत्वास नेण्याचा विडा

Vaih Sanitation Campaign in Vasai Fort | वसई किल्ल्यात विहीर सफाई मोहिम

वसई किल्ल्यात विहीर सफाई मोहिम

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वसई : वसई किल्ल्यात असलेली अष्टकोनी विहीर स्वच्छ करण्याची मोहिम टिम आमची वसईने हाती घेतली असून ती पावसाळ््यापूर्वी पूर्णत्वास नेण्याचा विडा उचलला आहे. वसई किल्ला परिसराला पूर्वी नागेश महातिर्थ असे संबोधण्यात येत असे. याठिकाणी १०८ तिर्थ, कुंड आणि जलस्त्रोत असल्याने नागेश महातिर्थ नावाने त्याला ओळखले जात असे. सध्या किल्ल्यात शंभरच्या आसपास गोड पाण्याचे जलस्त्रोत, कुंड आणि विहीरी आहेत. मात्र, पर्यटकांनी याठिकाणी असलेल्या अष्टकोनी विहीरीत दारुच्या बाटल्या, प्लास्टिक कचरा, ग्लास, दगड,म माती आदी केरकचरा टाकून तिची पार वाट लावली आहे. वापर होत नसल्याने आत गाळ साचून ती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्याचबरोबर परिसरात झाडे झुुडुपे उगवल्याने वसईचा ऐतिहासिक वारसा असलेली अष्टकोनी विहीर लुप्त होण्याच्या मार्गावर आहे.

Web Title: Vaih Sanitation Campaign in Vasai Fort

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.