वसईच्या बबलीने उकळले बँक अधिकाऱ्याकडून ४७ लाख

By admin | Published: January 11, 2016 01:48 AM2016-01-11T01:48:28+5:302016-01-11T01:48:28+5:30

बड्या बँकेतील उच्च अधिकाऱ्याशी सलगी प्रस्थापित करून नवऱ्याच्या मदतीने त्याच्याकडून ४७ लाख रुपये उकळणाऱ्या वसईच्या शिल्पा जाधवला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे

Vaishali burly boils down to Rs 47 lakh | वसईच्या बबलीने उकळले बँक अधिकाऱ्याकडून ४७ लाख

वसईच्या बबलीने उकळले बँक अधिकाऱ्याकडून ४७ लाख

Next

वसई : बड्या बँकेतील उच्च अधिकाऱ्याशी सलगी प्रस्थापित करून नवऱ्याच्या मदतीने त्याच्याकडून ४७ लाख रुपये उकळणाऱ्या वसईच्या शिल्पा जाधवला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. या गुन्ह्यात तिला साथ देणाऱ्या तिचा पती विकास गुप्ता उर्फ जावेद यालाही त्यांनी गजाआड केले आहे.
पैसेवाल्या व्यक्तींना हेरायचे त्यांच्याशी काहीतरी कारण
काढून ओळख निर्माण करायची त्यातून शारीरिक जवळीक साधायची व नंतर तिची छायाचित्रे
काढून चित्रण करून त्याआधारे अथवा तुमच्यापासून मी गरोदर राहिले, अशी बतावणी करून तिला ब्लॅकमेल करून खंडणी उकळायची असा या दुकलीचा गोरखधंदा होता. त्यात तिचा पतीही तिला साथ देत होता.
पंजाब नॅशनल बँकेतील एक उच्च अधिकारी गत फेब्रुवारीत फर्स्टक्लासमधून लोकलने प्रवास करीत होते. त्याला हेरून शिल्पा त्यांच्या समोरच्या आसनावर जाऊन बसली. माझ्या मोबाईलचे चार्जिंग संपले मला पतीला एक एसएमएस करायचा आहे त्यासाठी तुमचा मोबाईल द्या, म्हणून तिने विनंती केली. त्याने तो दिल्यावर त्यावरून तिने नवऱ्याला एसएमएस केला.
त्याचा फोन नंबर माहित झाल्यावर त्याच्याशी काही ना काही कारण काढून सतत संपर्क साधला. मग त्याच्या शाखेत जाऊन खातेही उघडले. त्यामुळे भेटीही घडवून आणल्या जाऊ लागल्या. नंतर तिने त्याला एका हॉटेलमध्ये बोलावले. थोडी मौजमजा करीत असताना शिल्पाच्या नवऱ्याने त्यांचे फोटो काढले.
या अधिकाऱ्याला एकटे गाठून तुम्ही माझ्या
पत्नीशी अफेअर करीत आहात, असे म्हणून त्याला ते फोटो दाखविले. मी शिल्पाचा नवरा आहे. माझे नाव जावेद आहे. असे सांगून ५० हजार रुपये द्या नाहीतर मी हे फोटो जगजाहीर करीन अशी धमकी देऊन ती रक्कम उकळली.
च्या पैशाचा वापर करून हे जोडपे अलिशान गाड्या, दागिने, चैनीच्या वस्तू घेत होते. यातला अनेक मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. त्यांना मरीन लाईन्स येथे खंडणीविरोधी पथकाने अटक केली.
च्जावेदने या अधिकाऱ्याला एकदा मारहाण देखील केल्याचे समजते. या जोडप्याने अशाच रितीने आणखी काही जणांना जाळ्यात पकडून ब्लॅकमेल केले आहे काय? याचा तपास आता पोलीस करीत आहेत.

Web Title: Vaishali burly boils down to Rs 47 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.