वाजपेयींच्या कविता मार्गदर्शक- राज्यमंत्री रवींद्र चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 04:06 AM2018-08-20T04:06:26+5:302018-08-20T04:06:55+5:30

सर्वपक्षीय श्रद्धांजली, कवितांमधून जीवनाकडे पाहण्यास शिकवले

Vajpayee's Poetry Guide - Minister of State Ravindra Chavan | वाजपेयींच्या कविता मार्गदर्शक- राज्यमंत्री रवींद्र चव्हाण

वाजपेयींच्या कविता मार्गदर्शक- राज्यमंत्री रवींद्र चव्हाण

Next

ठाणे : भारतरत्न तथा माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांनी केवळ विचारांमधूनच नाहीतर, आपल्या कवितांमधून देशाकडे आणि जीवनाकडे पाहण्यास शिकवले, असे उद्गार काढत राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहिली. रविवारी ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने सर्वपक्षीय श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी अटलजी यांच्या कवितासंग्रहातील निवडक कविता गायिका पद्मजा फेणाणी यांनी सादर करून त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला.
नेता म्हणून आपल्यासमोर कसे व्यक्तिमत्त्व हवे, तर ते अटलजींसारखे हवे, असे बोलत देशाप्रति नागरिकांची भक्ती कशी असावी, हे त्यांनी कवितांमधून दाखवून दिले. त्यांच्या कविता पुढील पिढीलाही मार्गदर्शक ठरतील. डोंबिवली आणि अटलजींचे एक आगळेवेगळे नाते असल्याने ते विविध कार्यक्रमांसाठी डोंबिवलीत येत. त्यामुळेच त्यांचे विचार कार्यकर्त्यांना लाभल्याचे चव्हाण यांनी सांगितले. भिवंडीचे खासदार कपिल पाटील यांनी अटलजींना श्रद्धांजली वाहताना, शब्दच अपुरे पडले असते, यामुळे त्यांच्या कवितांमधूनच त्यांना श्रद्धांजली वाहत असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह आमदार निरंजन डावखरे, संजय केळकर, रवींद्र फाटक, ठाणे शहराध्यक्ष संदीप लेले, काँग्रेस शहराध्यक्ष मनोज शिंदे, विक्रांत चव्हाण, रवी मोरे यासह नगरसेवक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Vajpayee's Poetry Guide - Minister of State Ravindra Chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.