व्हेल माशाची दोन कोटींची उलटी जप्त, दोन जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2021 07:20 AM2021-11-18T07:20:45+5:302021-11-18T07:21:10+5:30

ठाण्यातून दोन जणांना अटक : आरोपींना १८ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी

vale vomit worth Rs 2 crore seized, two arrested | व्हेल माशाची दोन कोटींची उलटी जप्त, दोन जणांना अटक

व्हेल माशाची दोन कोटींची उलटी जप्त, दोन जणांना अटक

Next
ठळक मुद्देवागळे इस्टेट परिसरातील रोड नंबर १६ येथील साउथ कोस्ट हॉटेल येथे मोटारसायकलीवरून दोघे जण व्हेल माशाची उलटी विक्रीसाठी येत असल्याची माहिती श्रीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक लक्ष्मण तांबे यांना मिळाली होती.

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : अतिशय दुर्मीळ समजली जाणारी व्हेल माशाची उलटी बेकायदेशीररीत्या स्वत:जवळ बाळगून ती विक्रीसाठी आलेल्या एका दुकलीच्या श्रीनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून दोन कोटींहून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दुकलीला १८ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

वागळे इस्टेट परिसरातील रोड नंबर १६ येथील साउथ कोस्ट हॉटेल येथे मोटारसायकलीवरून दोघे जण व्हेल माशाची उलटी विक्रीसाठी येत असल्याची माहिती श्रीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक लक्ष्मण तांबे यांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून चारकोप, कांदिवलीच्या मयूर देवीदास मोरे (३१) आणि अहमदनगर, जामखेडच्या प्रदीप अण्णा मोरे (३४) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती केली असता, त्यांच्याकडील बॅगमध्ये असलेल्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये पिवळसर तांबट रंगाचे वेगवेगळ्या आकारांच्या दगडसदृश वस्तू आढळून आल्या. त्याचे वजन सुमारे ०२.०४८ कि.ग्रॅ. असून, ती व्हेल माशाची उलटी असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. ती उलटी मध्यस्थीच्या मदतीने २ कोटी रुपयांना विक्रीसाठी घेऊन आल्याचे त्यांनी सांगितले. या व्हेल माशाच्या उलटीसह दोन मोबाइल फोन आणि मोटारसायकल असा दोन कोटी २२ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

काय आहे अंबरग्रीस 
व्हेल माशाच्या उलटीतून तयार होणाऱ्या दगडास अंबरग्रीस असे म्हटले जाते. अंबरग्रीसचा लहानसा खडाही शर्टावर चोळल्यास त्यातून निघणारा सुगंध महिनाभर टिकतो. परदेशातील सिगारेटमध्येही सुंगधासाठी अंबरग्रीसचा वापर होतो. त्यामुळे परदेशात अंबरग्रीसला मोठी मागणी आहे. गेल्या काही वर्षांपासून या अंबरग्रीसच्या तस्करीचे प्रमाण वाढले आहे.

Web Title: vale vomit worth Rs 2 crore seized, two arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.