कारवाईच्या आश्वासनानंतर वाल्मीकी समाजाचे उपोषण मागे: डूकराच्या कत्तलीमुळे संताप

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2021 12:21 AM2021-09-02T00:21:23+5:302021-09-02T00:24:28+5:30

वाल्मीकी समाजाने पवित्र मानलेल्या डुकराची हत्या करणाऱ्यांवर कडक कारवाईचे आश्वासन श्रीनगर पोलिसांनी दिल्यानंतर वाल्मीकी समाजाच्या कार्यकर्त्यांनी आपले उपोषणाचे आंदोलन बुधवारी सायंयकाळी मागे घेतले.

Valmiki community goes on hunger strike after promise of action: Anger over pig slaughter | कारवाईच्या आश्वासनानंतर वाल्मीकी समाजाचे उपोषण मागे: डूकराच्या कत्तलीमुळे संताप

श्रीनगर पोलीस ठाण्यात तक्रार

Next
ठळक मुद्देरामनगरमधील घटनाश्रीनगर पोलीस ठाण्यात तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : वाल्मीकी समाजाने पवित्र मानलेल्या डुकराची हत्या करणाऱ्यांवर कडक कारवाईचे आश्वासन श्रीनगर पोलिसांनी दिल्यानंतर वाल्मीकी समाजाच्या कार्यकर्त्यांनी आपले उपोषणाचे आंदोलन बुधवारी सायंयकाळी मागे घेतले. याप्रकरणी संबंधितांविरुद्ध कारवाई केली जाणार असल्याची माहिती श्रीनगर पोलिसांनी दिली.
वागळे इस्टेट, रामनगर, साठेनगर भागातील वाल्मीकी समाजातील एका कुटूंबाने श्रद्धेपोटी डुकराला देवासाठी सोडले होते. परंतू, बुधवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास एका नविन बांधकामाच्या ठिकाणी कोणीतरी त्याची हत्या केल्याचे आढळले. हा प्रकार समजताच वाल्मीकी समाजातून संताप व्यक्त करण्यात आला. हे दुष्कृत्य करणाऱ्यांवर कारवाईसाठी वाल्मीकी समाजाचे कार्यकर्ते सुरेंद्र भुंबक, सुभाष भुंबक आणि नगरसेवक राजकुमार यादव आणि आरपीआयचे सुरेश कांबळे आदींनी डुकराची हत्या झालेल्या ठिकाणीच टीएमटी वागळे इस्टेट आगारासमोरील वाल्मीकी पाडा येथे सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास उपोषणाच्या आंदोलनाला सुरुवात केली. दरम्यान, संबंधितांविरुद्ध कारवाईचे आश्वासन श्रीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल शिंदे यांनी दिल्यानंतर या आंदोलकांनी सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास आंदोलन मागे घेतले. या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्यात येत असल्याची माहिती श्रीनगर पोलिसांनी दिली.

Web Title: Valmiki community goes on hunger strike after promise of action: Anger over pig slaughter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.