महिला पत्रकार विनयभंग प्रकरण: बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांना कोर्टाचा दणका
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2024 05:54 IST2024-08-30T05:54:38+5:302024-08-30T05:54:58+5:30
वामन म्हात्रेंचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला.

महिला पत्रकार विनयभंग प्रकरण: बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांना कोर्टाचा दणका
लोकमत न्यूज नेटवर्क, बदलापूर : बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी एका महिला पत्रकाराचा विनयभंग केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी केलेला अटकपूर्व जामीन अर्ज कल्याण सत्र न्यायालयाने गुरुवारी फेटाळला.
बदलापुरात विद्यार्थिनींवर अत्याचार झाल्यानंतर जनक्षोभ उसळला होता. त्यावेळी वामन म्हात्रे यांनी महिला पत्रकाराला अपशब्द वापरून विनयभंग केल्याप्रकरणी त्यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणात अटक टाळण्यासाठी म्हात्रे यांनी कल्याण सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. आता म्हात्रे अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.