वांगणीचा विकास खुंटला, राम पातकर यांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2019 03:21 AM2019-02-03T03:21:17+5:302019-02-03T03:21:48+5:30

एमएमआरडीएच्या विसंगत नियमावलीचा फटका ग्रामीण भागाला बसत आहे. विकास आराखड्याअभावी बदलापूरजवळील वांगणी परिसराचाही विकास खुंटला आहे

Vangani's development is stop, Ram Patkar's opinion | वांगणीचा विकास खुंटला, राम पातकर यांचे मत

वांगणीचा विकास खुंटला, राम पातकर यांचे मत

Next

अंबरनाथ  - एमएमआरडीएच्या विसंगत नियमावलीचा फटका ग्रामीण भागाला बसत आहे. विकास आराखड्याअभावी बदलापूरजवळील वांगणी परिसराचाही विकास खुंटला आहे, असे मत बदलापूरचे माजी नगराध्यक्ष व भाजपाचे स्थानिक नेते राम पातकर यांनी व्यक्त केले
आहे.
पातकर यांच्या नेतृत्वाखाली वांगणी परिसर विकास समितीने अलीकडेच राज्याच्या नगररचना विभागाचे प्रधान सचिव डॉ. नितीन करीर यांची भेट घेऊन मुंबई महानगर विकास आराखड्यात आवश्यक दुरुस्ती करून मंजूर करण्याबाबत चर्चा केली.
या शिष्टमंडळात निखिल शेलार, राहुल शेलार, एकनाथ शेलार, दीपक कुडके, विद्याधर पलांडे, गणेश देशमुख यांच्यासह अनेक मान्यवरांचा समावेश होता. पंधरा दिवसांत यासंदर्भात कार्यवाही करण्याचे आश्वासन यावेळी समितीला देण्यात आल्याची माहिती पातकर यांनी दिली. गेल्या काही वर्षांत बदलापूरजवळील ग्रामीण भागाची लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. या भागाजवळच असलेल्या बदलापूर नगरपालिका हद्दीत २०-२० मजल्यांच्या इमारतींच्या बांधकामांना परवानगी मिळतआहे.

परंतु, विभागीय तसेच विकास आराखडा नसल्याने वांगणीत इमारतींच्या बांधणीला परवानगी मिळत नाही. त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात चाळींचे प्रमाण वाढत चालले असून बेकायदा बांधकामांचे पेव फुटले आहे.
त्यामुळे या भागाचा नियोजनबद्ध विकास होण्यासाठी एमएमआरडीएने विकास आराखडा जाहीर करून त्यांनाही नगरपालिका क्षेत्राप्रमाणे विकास नियंत्रण नियमावली लागू करावी, अशी आपली मागणी असल्याचे पातकर यांनी सांगितले. एमएमआरडीए कुठला निर्णय घेते याकडे लक्ष लागले आहे.

०.२ एफएसआय देऊन अन्याय

पुण्याला एक एफएसआय, नगरपालिका, महापालिकांतर्गत असलेल्या मुरबाडला व शहापूरला एक एफएसआय बांधकाम परवानगी मिळत आहे. परंतु, कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या हद्दीजवळ असलेल्या वांगणी व इतर ग्रामीण भागाला मात्र ०.२ एफएसआय हे अन्यायकारक आहे. या भागालाही एक एफएसआयची परवानगी मिळावी. त्याचप्रमाणे गावठाण हद्दीपासून १५०० मीटर परीघ मान्य करण्यात यावा व रस्त्याजवळ २०० मीटरपर्यंत आर झोन जाहीर करावा, आदी मागण्या करण्यात आल्या.

Web Title: Vangani's development is stop, Ram Patkar's opinion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे