‘वारी’ हे तर विद्यापीठ
By जान्हवी मोर्ये | Published: July 22, 2018 12:08 AM2018-07-22T00:08:58+5:302018-07-22T00:10:07+5:30
वारकऱ्यांचे अनुभव; नेतृत्वाविना स्वयंशिस्तीचे दर्शन
डोंबिवली : ज्येष्ठ महिना सरत आला की, वारकºयांना वेध लागतात ते विठुमाऊलीच्या दर्शनाचे. पंढरीचा वास, चंद्रभागेचे स्नान आणि विठोबाच्या दर्शनाची आस वारकºयांना ओढून नेते. वारीतील शिस्त वाखाणण्याजोगी असून वारी म्हणजे एक विद्यापीठच आहे. जे आम्हा सर्वांना खूप काही शिकवून जाते. आयुष्यात एकदा तरी प्रत्येकाने वारी करावी, असे मनोगत डोंबिवलीतील अलका कोकजे यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केले.
कोकजे यांना वारीविषयी उत्सुकता होती. मात्र, त्यांना सोबत मिळत नसल्याने सहभागी होता येत नव्हते. अनेक वर्षांची त्यांची वारी करण्याची इच्छा यंदा पूर्ण झाली. देवकी मानकामे यांची साथ त्यांना मिळाली. पुण्याहून त्यांनी आळंदी गाठले. आळंदीहून पालखीसोबत ३० किमी चालून एक दिवसाचा मुक्काम केला. त्यानंतर, पुणे ते सासवड ३५ किमीचे अंतर पार केले.
लाखो वारकरी ऊन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता पंढरीच्या दिशेने चालतात. कोणतेही नेतृत्व नसताना स्वयंशिस्तीने वारकरी पालखीबरोबर लयबद्ध पावले टाकत चालत असतात. अभंग-भजने गात, फुगड्या घालत दिंड्या पुढे सरकत होत्या. वारी ज्या मार्गाने जाते, त्या वाटेवरील गावांतील लोक माऊलीच्या दर्शनासाठी तासन्तास ताटकळलेले पाहिले की, मन भरून येते. वारकºयांना चहा, नाश्ता, फळे, पाणी, लाडू, जेवण यांची प्रत्येक गावागावांतून सोय केलेली असते.
चप्पल दुरुस्त करून देणे, मोफत बॅग दुरुस्त करून देणे, औषधे पुरवणे याचीही काळजी घेतली जाते. पोलीस आपली जबाबदारी चोख बजावतात. वस्तीला राहणाºया वारकºयांना ओट्यावर झोपायला देणे, अंघोळीला पाणीही दिले जाते, असे मानकामे म्हणाल्या.
एकोप्याची शिकवण
नामस्मरणाचा हा सामुदायिक गजर देशाला खूप मोठी सकारात्मक ऊर्जा नक्कीच मिळवून देत आहे. वारीत कुणी लहानमोठा नसतो. सगळे सारखे, एकमेकांना मदतीचा हात देणारे, काळजी घेणारे असतात. वारकºयांचा हा एकोपा पाहिला की, खरेच असे वाटते की, प्रत्येकाने एकतरी वारी अनुभवावी, असे कोकजे म्हणाल्या.