ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर संकेत देशपांडे स्मृतिदिनानिमित्त विविधरंगी कलाविष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2020 05:07 PM2020-02-10T17:07:59+5:302020-02-10T17:11:13+5:30

विविध कलाविषकरांच्या माध्यमातून अभिनय कट्ट्यावर संकेत देशपांडेला आदरांजली वाहण्यात आली. 

Various colored artisans on the occasion of Ashok Deshpande on the occasion of acting in Thane | ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर संकेत देशपांडे स्मृतिदिनानिमित्त विविधरंगी कलाविष्कार

ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर संकेत देशपांडे स्मृतिदिनानिमित्त विविधरंगी कलाविष्कार

googlenewsNext
ठळक मुद्देअभिनय कट्ट्यावर संकेत देशपांडे स्मृतिदिनानिमित्त विविधरंगी कलाविष्कारसंकेत देशपांडे स्मृती करंडक द्विपात्री स्पर्धा गाजवणाऱ्या द्वीपात्रीच्या जुगलबंदीने आली रंगत संकेत म्हणजे एक सच्चा रंगकर्मी - किरण नाकती

ठाणे : संकेत देशपांडे अभिनय कट्ट्याचा एक गुणी कलाकार.एक उत्तम अभिनेता ,एक लेखक,एक उत्कृष्ट निवेदक परंतु ह्या रंगभूमी मालिका चित्रपट ह्या सर्व क्षेत्रात स्वतःचा वेगळा ठसा उमटावणाऱ्या ह्या अवलियाने गेल्या वर्षी अचानक एक्झिट घेतली आणि ठाण्यातील कलासृष्टी हळहळली.अशाच संकेतचा ७ फ्रेब्रुवारी हा स्मृतिदिन त्यावर औचित्य साधून अभिनय कट्ट्यावर एका प्रामाणिक आणि अष्टपैलू कलाकाराला कलाविष्कारातून आदरांजली वाहिली.

      अभिनय कट्टा क्रमांक ४६७ ची सुरुवात संकेत देशपांडे स्मृती करंडक द्विपात्री स्पर्धेचे विजेते रितेश पिटले आणि हर्षाली बारगुडे ह्यांच्या शुभ हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली.त्यांनतर अभिनय कट्टा बालसंस्कार शास्त्रातील आपल्या कलाविष्कारातूनआपल्या लाडक्या संकेत दादाला आदरांजली वाहिली. आर्या चोरगे हिने 'रमाबाई रानडे',आराव चोरगे ह्याने 'शिवाजी महाराज',तनिष्का हेरवडे हिने 'ती फुलराणी' ह्या एकपात्री सादर केल्या.आराव चोरगे आणि देवांशी पवार यांनी जय जय जय हनुमान आणि झुक झुक गाडी ही गीते सादर केली.शिवम सुळे ह्यांर शेकोटी आणि स्वरा हिने झुक झुक गाडी ही गीते सादर केली.सोबतच प्रथम नाईक ह्याने लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ ह्यांच्या जीवनावर आधारित लेखाचे  तर स्वरा बांदल हिने सावित्रीबाई फुले ह्यांच्यावरील लेखाचे अभिवाचन केले.आर्यन चोरगे आणि अनया चोरगे ह्यांनी सादर केलेल्या जोगवा नृत्याने प्रेक्षकांची विशेष दाद मिळवली.  कार्यक्रमात खरी रंगत आली ती संकेत देशपांडे स्मृती करंडक द्विपात्री स्पर्धा गाजवणाऱ्या द्वीपात्रीच्या जुगलबंदीने.कार्यक्रमात प्रतिभा घाडगे आणि आणि नरेंद्र सावंत ह्यांनी मॉडर्न इंद्रदेव आणि इंद्रायणीच्या मिटू ची गोष्ट सांगणाऱ्या 'पाहुणे आले पळा पळा' तर मानसी पवार आणि प्रगती नायकवाडी ह्यांनी आजच्या मोडर्न जगात जिथे माणुसकी हरवत चाललीय अशात 'मयताच्या इव्हेंट मॅनेजमेंट' ही द्विपात्री सादर केली. निकेत हळवे आणि प्रथमेश साळवी ह्यांनी जोडून जन्मलेल्या जुळ्या भावांची एक आगळी वेगळी कहाणी सादर करून समाजात प्रत्येक घटकांचे समांतर स्थान असते आणि प्रत्येक घटक हा दुसऱ्या घटकावर अवलंबून असतोच हे मांडणारी 'जुळे भाऊ' तर अजय कुलकर्णी आणि गणेश कदम ह्यांनी राजकीय सामाजिक आणि फिल्मी जगतावर हसत खेळत भाष्य करणारी 'चित्रपटाचा स्क्रीन प्ले' ह्या धम्माल द्विपात्री सादर केल्या.स्पर्धेत धम्माल उडवणारी अक्षता साळवी आणि प्रचो सोनवणे ह्यांनी कोळीवाड्यात हरवलेल्या पाण्याची धम्माल विनोदी द्विपात्री 'पाणी' आणि स्पर्धेत अजिंक्यपद पटकावणारी 'माप' ही सप्तपदीवर भाष्य करून यांच नवरा बायकोच्या आयुष्यातील महत्व स्थान सांगणारी द्विपात्री सादर केली. एकांकिका एकपात्री द्विपात्री स्पर्धा होत असतात पण स्पर्धेसोबतच त्या कलाकृतीला हक्काचं रंगमंच पण उपलब्ध करून दिल्याबद्दल स्पर्धकांनी अभिनय कट्ट्याचे आभार मानले.

      संकेत म्हणजे एक सच्चा रंगकर्मी त्याची आठवण ही एका कलाकृतीनेच साजरी करू शकतो.आम्हाला न सांगता एक्झिट घेणारा आमच्या संकेतचा जन्मदिवस आम्ही कलाविष्कारानेच साजरा करू शकतो. कलाकाराला हवी असते संधी एक रंगमंच आणि अभिनय कट्टा तो नेहमी उपलब्ध करून देत राहणार.म्हणूनच ही स्पर्धा अविरत चालू राहणार आणि संकेत ह्या रंगभूमीवर आम्हाला विविध कलाकृतीमधून अनुभवायला मिळत राहणार आणि अभिनय कट्टा संकेत सारखे असंख्य कलाकारांना नेहमी जपणार असे मत अभिनय कट्ट्याचे संस्थापक अध्यक्ष किरण नाकती ह्यांनी व्यक्त केले.

Web Title: Various colored artisans on the occasion of Ashok Deshpande on the occasion of acting in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.